आष्टी(बीड ) - भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पक्षाबद्दलची नाराजी पुन्हा ( Pankaja Munde express displeasure ) एकदा समोर आली आहे. मी जर जनतेच्या मनावर राज्य करत असेल तर माझं राजकारण मोदीसुध्दा संपू शकत नाहीत असे खळबळजनक व्यक्तव्य भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी एका ( displeasure with taking name of PM Modi ) खासगी कार्यक्रमात केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा ( PM Modi birthday program in Beed ) पंधरवाड्यानिमित्ताने अंबाजोगाई जि. बीड येथे आयोजित कार्यक्रमात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार डाॅ. प्रितम मुंडे यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे म्हणाल्या, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील वंशवाद संपवला आहे. तसेच माझ्या पाठीमागे तुमच्या सारखी जनता जनार्धन असून,मी जनतेच्या मनावर राज्य केलं आहे. त्यामुळे माझे राजकारण मोदीही संपू शकत नाहीत. पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
मंत्रीमंडळात समावेश नसल्याने पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळ विस्ताराबाबत समावेश करण्यात आला नाही. त्यावर पंकजा मुंडे यापूर्वी म्हटले होते, की पक्षाला वाटले असेल मी पदाला योग्य नाही. त्यामुळे मला पद मिळाले नसेल. त्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. त्याच पार्श्वभूमीवर बोलताना भाजपचे नेते गिरीश म्हणाले होते की, आताच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात पंकजा ताईंना स्थान मिळणार का, तसेच त्यांच्या नाराजीबाबत विचारले असता, त्यांनी याबाबत निश्चितच योग्य मार्ग निघेल. पंकजा ताई पक्षाच्या नेत्या आहेत, त्यांच्याबाबत पक्षश्रेष्ठी निश्चितच गांभीर्याने योग्य विचार करतील. त्या नाराज आहेत, असे आम्हाला वाटत नाही.