बीड- आष्टी महावितरणयामध्ये कार्यरत असलेले वरीष्ठ तंत्रज्ञ शिवाजी गोरे यांना महावितरण उत्कृष्टता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. उस्मानाबाद परिमंडळ कार्यालयांतर्गत बीड मंडळाकडून हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. महावितरणाच्या कामांमध्ये उल्लेखणीय कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उत्कृष्टता पुरस्कार देण्यात येतो.
शिवाजी बापूराव गोरे आष्टी येथील महावितरण कार्यालयात गेल्या सोळा वर्षापासून कर्तव्य बजावत आहेत. त्यांनी नेहमीच ग्राहकांच्या अडचणींना प्रथम प्राधान्य दिले. तसेच त्यांच्या कार्यक्षेत्र भागात १०० टक्के वीज बिलाची वसूली करण्यात आली आहे. त्यांच्या या कामाची दखल घेत महावितरण विभागाने शिवाजी गोरे यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. प्रशस्तीपत्रक, सन्मानपदक व पाच हजार रुपये असे या पुरस्काराचे स्वरुप असून लवकरच या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या बातमीनंतर विविध स्तरातून गोरे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.