ETV Bharat / state

अनाधिकृत रुग्णालय प्रकरण : सुदाम मुंडेचा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने फेटाळला

author img

By

Published : Oct 6, 2020, 11:30 AM IST

राज्यभर गाजलेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे डॉ. सुदाम मुंडे. याप्रकरणी महसूल प्रशासन व आरोग्य विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षाही सुनावली. मुंडेची याप्रकरणी जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने कोरोना काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत, परळी येथे पुन्हा आपले रुग्णालय सुरू केले होते.

Bail petition of Dr Sudam Munde rejected by Ambajogai court
अनाधिकृत रुग्णालय प्रकरण : सुदाम मुंडेचा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने फेटाळला

बीड - राज्यभरात गाजलेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. सुदाम मुंडे याचा जामीन अर्ज अंबाजोगाई न्यायालयाने सोमवारी फेटाळला आहे. अनधिकृतपणे रुग्णालय सुरू केल्यावरून पुन्हा सुदाम मुंडेला अटक करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. तत्पूर्वी डॉ. सुदाम मुंडे याने मला जामीन द्यावा, अशी याचिका न्यायालयाकडे केली होती.

२०१२-१३ मध्ये राज्यभर गाजलेल्या स्त्रीभ्रूण हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणजे डॉ. सुदाम मुंडे. याप्रकरणी महसूल प्रशासन व आरोग्य विभाग तसेच पोलीस विभाग यांच्या संयुक्त कारवाईमध्ये त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला शिक्षाही सुनावली. मुंडेची याप्रकरणी जामीनावर सुटका झाली होती. त्यानंतर त्याने कोरोना काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत, परळी येथे पुन्हा आपले रुग्णालय सुरू केले होते.

पुन्हा रुग्णालय सुरू केल्याचे लक्षात येताच, सुदामला पुन्हा एकदा अटक करण्यात आली. यानंतर त्याने अंबाजोगाई न्यायालयाकडे जामीन अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्याचा हा अर्ज फेटाळल्यामुळे आता त्याच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. सध्या मंडे पोलीस कोठडीत असून, परळी पोलीस अधिक तपास करत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.