ETV Bharat / state

विद्यापीठातील शिकवणी वर्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थांचे उपोषण

author img

By

Published : Jan 7, 2021, 5:37 PM IST

ऑनलाइन शिक्षण बंद करून वर्ग भरवण्यात यावे. वसतीगृह, ग्रंथालय सुरू करण्यात यावे यासह इतर मागण्यांसाठी विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी अनुदान आयोगाने विद्यापीठाचे नियमित कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले होते. इतर विद्यापीठांनी निर्णय घेऊन तशा पद्धतीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन सुस्त असून त्यांनी अजून कुठलीच हालचाल केलेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

औरंगाबाद डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ न्यूज

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील ऑनलाइन शिक्षण बंद करून वर्ग भरवण्यात यावे. वसतीगृह, ग्रंथालय सुरू करण्यात यावे, यासह इतर मागण्यांसाठी विद्यापीठातील सर्व विद्यार्थी संघटना गुरुवारी (ता. ७) एकत्र आल्या.

पोलिसांनी घेतले विद्यार्थ्यांना ताब्यात

दरम्यान, संघटनांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमोर काल ठिय्या आंदोलन केले. विद्यार्थी परवानगीविना आंदोलन करत असल्याच्या कारणावरून पोलिसांनी विद्यार्थांना ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.

हेही वाचा - नंदुरबारमध्ये नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची धडक कारवाई

काय म्हणतात विद्यार्थी

काही दिवसांपूर्वी अनुदान आयोगाने विद्यापीठाचे नियमित कामकाज सुरू करण्याचे निर्देश दिले होते. इतर विद्यापीठांनी निर्णय घेऊन तशा पद्धतीने हालचाली सुरू केल्या आहेत. मात्र, औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रशासन सुस्त असून त्यांनी अजून कुठलीच हालचाल केलेली नाही, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

यात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ऑनलाईन समजण्यास अवघड जात आहे. तर, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत आहेत. यामुळे कधीपर्यंत विद्यार्थ्यांचे नुकसान करणार आहे, असा सवालदेखील यावेळी विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. त्यामुळे जोपर्यंत प्रशासन आम्हाला लेखी स्वरूपात काही कळवत नाही, पर्यंत उपोषण सुरू ठेवणार असल्याचे विद्यार्थी संघटनांनी सांगितले. यावेळी नितीन वावले, अमोल खरात, दीक्षा पवार, अक्षय जाधव, स्वाती चेके, श्रद्धा खरात, अनिल जाधव, राम सूर्यवंशी, सुरेश सानप, लोकेश कांबळे, निशिकांत कांबळे, पांडुरंग भुतेकर, अविनाश सावंत सहभागी होते.

हेही वाचा - नाशिकच्या दुडगाव शिवारात बिबट्या जेरबंद, आणखी बिबटे असण्याची शक्यता

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.