ETV Bharat / state

Corona Vaccine Shortage : औरंगाबाद मनपाकडे कोरोना लसीचा तुटवडा; मागितल्या पन्नास हजार अन् आल्या 160

author img

By

Published : Jan 13, 2023, 4:33 PM IST

चीनमध्ये कोरोनाचा वाढता कहर पाहता राज्यभर अलर्ट जारी करण्यात आला आहे. असे असले तरी कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध करून देताना सरकार मात्र उदासीन असल्याचे पाहायला मिळत आहे. औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे लसच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. पन्नास हजार लसीची मागणी केल्यानंतर अवघ्या 160 लसी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे सरकार येणाऱ्या संभाव्य धोक्यासाठी किती सज्ज आहे. याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

Health Department of Aurangabad Municipal Corporation
औरंगाबाद महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग

मनपाकडे कोरोना लसी संपल्या, मागितल्या पन्नास हजार आल्या 160

औरंगाबाद : कोरोना लसीकरण मोहीम नवीन वर्षात बंद पडल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. मागील वर्षीचा असलेला लसींचा साठा कालबाह्य झाल्याने, तो नष्ट करण्यात आला. त्यामुळे 1 जानेवारीपासून ते 10 जानेवारी या काळात लसीकरण मोहीम पूर्णत बंद ठेवण्यात आली होती. याबाबत महानगरपालिका आरोग्य विभागाने राज्य सरकारला माहिती देखील दिली असून, पन्नास हजार लसींचा मागणी करण्यात आली होती. मात्र लस उपलब्ध नसल्याने आरोग्य अधिकाऱ्यांनी आपल्या स्तरावर इतरत्र असलेल्या लसींचा डोस मिळवण्याची हालचाली केल्या आणि अवघ्या 160 लस प्राप्त झाल्या. या देखील एक ते दोन दिवसात संपतील आणि पुन्हा लसीकरण मोहीम बंद पडेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

लसींची मागणी वाढली : मागील काही महिन्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग आटोक्यात आल्याने, नागरिकांनी कोरोना चाचणी आणि लसीकरण दोन्हीकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. मात्र काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता आरोग्य यंत्रणांनी वर्तवल्यानंतर नागरिक आरोग्य तपासणीसाठी येत आहेत. इतकच नाही तर कोरोना प्रतिबंधात्मक लस घेण्यासाठी विचारणा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही जणांचा दुसरा तर काहींचा बूस्टर डोस शिल्लक असल्याने, लसीकरण करून घेण्यासाठी नागरिक येत आहेत. शहरात सध्या तीन ठिकाणी लसीकरण मोहीम सुरू असून मागणी वाढल्यास इतरत्र देखील लसीकरण सुरू होईल असे महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आले.

आरोग्य यंत्रणा सज्ज : औरंगाबाद महानगरपालिका हद्दीत एक कोरोना सक्रिय रुग्ण असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात आरोग्य यंत्रणा किती सज्ज आहे, याबाबत तपासणी करण्यात आली. रुग्ण आल्यावर किती वेळात त्याच्यावर उपचार सुरू होतील. ऑक्सिजन उपलब्धता, व्हेंटिलेटरची उपलब्धता या सर्व यंत्रणा तपासण्यात आल्या, सध्या कोरोना आटोक्यात असला तरी आरोग्य यंत्रणा मात्र पूर्णपणे सज्ज असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

महाराष्ट्रात कोरोना रुग्ण : गुरुवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 18 नवीन रुग्ण आढळले होते. तर एका कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला होता. यासह राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 81 लाख 36 हजार 883 झाली आहे, तर कोरोनामुळे मृतांचा आकडा 1 लाख 48 हजार 419 वर पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली.

कोरोनामधून बरे होण्याची टक्केवारी : आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, याच्या एक दिवस आधी महाराष्ट्रात कोरोनाचे २१ नवीन रुग्ण आढळले होते. याशिवाय महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत २३ जण कोरोनामधून बरे झाले आहेत. यासह राज्यातील कोरोनामधून बरे झालेल्या एकूण बाधितांची संख्या ७९ लाख ८८ हजार ३२५ झाली असून सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या १३९ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने सांगितले की, राज्यात कोरोनामधून बरे होण्याची टक्केवारी 98.17 आहे, तर राज्यात आतापर्यंत 8 कोटी 60 लाख 68 हजार 763 कोरोना चाचण्या झाल्या आहेत. गेल्या 24 तासांत राज्यात 12 हजार 741 चाचण्या करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : Corona Vaccine Side Effects कोरोनाच्या दुसऱ्या डोसनंतर पुरुषांमध्ये मायोकार्डिटिसचे प्रमाण वाढले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.