ETV Bharat / state

NCP Party Workers Resignation : नामांतर विरोधात राष्ट्रवादीच्या चाळीस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे; 'हे' आहे कारण

औरंगाबाद जिल्ह्याच्या नामांतराविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या चाळीस पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले आहेत. औरंगाबादचे नाव बदलल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने भूमिका मांडली नाही, म्हणून आम्ही आमचे राजीनामे दिल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

NCP Party Workers Resignation
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी जावेद खान प्रतिक्रिया देताना
author img

By

Published : Mar 8, 2023, 9:40 PM IST

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी जावेद खान प्रतिक्रिया देताना

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) : नामांतराच्या मुद्द्यावरून शहरात नामांतर विरोधी कृती समितीने साखळी उपोषण आंदोलन सुरू केले. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी देखील आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. पूर्व मतदार संघातील जवळपास 40 पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे पक्षाकडे पाठवल्याची माहिती देण्यात आली. शहराचे नाव बदलल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने भूमिका मांडली नसल्याने नागरिक आपल्यावर टीका करत असल्याने राजीनामा देत असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी पक्षावर टीका : शहराचे नामकरण होऊन जवळपास पंधरा दिवस झाले आहेत. मात्र धर्मनिरपेक्ष समजला जाणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केले नाही. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शहराचे नाव बदलण्यास विरोध असणाऱ्या पक्षाने देखील आता केंद्र सरकारच्या निर्णयाला समर्थन दिले का? अशी चर्चा सुरू झाली. त्यात आता राष्ट्रवादीला मानणाऱ्या आणि नामांतर विरोधी असणाऱ्या नागरिकांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर टीकास्त्र सोडल आहे. नेमकं यात भूमिका काय स्पष्ट करावी, हे पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना कळत नसल्याने त्यांनी आपल्याकडे असलेल्या पदांचा राजीनामा देत पक्षाला घरचा आहेर दिला आहे.

लवकरच घेणार निर्णय : शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर केल्यानंतर काही दिवसातच सर्वात पहिले जिल्ह्याचे खासदार आणि एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी विरोध दर्शवत आपली भूमिका मांडली. कोणत्या तरी एका नेत्याच्या सांगण्यावरून जिल्ह्याचे नाव कसे बदलू शकतो, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे शहराच्या नावाला विरोध असणाऱ्या लोकांनी समर्थन दर्शवला. त्यातच राष्ट्रवादीचा मतदार नाराज होईल, या भीतीने आता पक्षात राजीनामा सत्र सुरू झाला आहे. मात्र आगामी काळातील भूमिका लवकरच स्पष्ट करू. आमची नाराजी आम्ही पक्षापर्यंत पोहोचवली आहे जर पक्षांनी योग्य भूमिका घेतली नाही तर इतर पक्षात जाण्याबाबत आमचा निर्णय बैठकीनंतर होईल, असे मत राष्ट्रवादी कार्याध्यक्ष जावेद खान यांनी व्यक्त केले.

हेही वाचा : AIMIM Oppose Renaming : नामांतर विरोधी आंदोलनात झळकला औरंगजेबाचा फोटो; आंदोलन चिघळण्याची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.