ETV Bharat / state

Mobile Tower Stolen : चक्क मोबाईल टॉवर गेले चोरीला, न्यायालयाच्या आदेशाने गुन्हा दाखल

author img

By

Published : Nov 11, 2022, 3:34 PM IST

( Mobile tower stolen in Aurangabad ) औरंगाबाद येथील वाळूज परिसरात मोबाईल टावर चोरीला गेल्याची घटना घडली आहे. संबंधित प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने न्यायलयात याचिका दाखल केली. यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat

औरंगाबाद : आजपर्यंत घरातून मौल्यवान साहित्य, पैसे, दागिने वाहन चोरी झाल्याच्या घटना ऐकल्या असतील. मात्र औरंगाबादच्या वाळूज परिसरात चक्क मोबाईल टॉवर चोरीला ( Mobile tower stolen in Aurangabad ) गेले आहे. यावर पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार दिल्याने तक्रारदाराने थेट न्यायालय गाठले त्यानंतर वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाईल टॉवर चोरीला - जीटीएल इन्फास्ट्रक्चर ही कंपनी मोबाईलचे नवीन टॉवर उभारणे आणि त्याची देखभाल दुरुस्तीचे काम करते. 2009 मधे वाळूज येथील अरविंद न्यायाधीश यांच्या मालकीची के सेक्टर येथील जागा दहा वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेतली. त्यासाठी दरमहा 9500 रुपये भाडे कंपनीने दिले. हा करार संपण्याआधी 2018 मधे टॉवर बंद पडले. मात्र कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. मात्र नव्याने नियुक्त झालेले कंपनीचे प्रतिनिधी अमर लाहोट यांनी जागेची पाहणी केली असता. टॉवर जागेवर आढळून आले नाही. त्यावरून त्यांनी पोलिसात धाव घेत टॉवर गायब असल्याची तक्रार दिली.

पोलिसांचा तक्रार घेण्यास नकार - संबंधित जागेवर टॉवर बसवताना जनरेटरसह इतर साहित्य आणि यंत्रणा बसवली होती. 2019 मधे करार संपुष्टात आला. त्यावेळी कंपनीचा प्रतिनिधी नसल्याने पुढील कारवाई होऊ शकली नाही. मात्र नंतर कंपनीने अमर लाहोट यांची नियुक्ती केली. लाहोट यांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन टॉवर बाबत पाहणी केली असता टॉवर आढळून आला नाही. इतकेच नाही तर सर्व साहित्य गायब असल्याचे निदर्शनास आले. जवळपास 34 लाख 50 हजार 676 रुपयांचे साहित्य चोरीला गेल्याची तक्रार पोलिसात देण्यात आली. मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने कंपनी प्रतिनिधीने न्यायालयात धाव घेतली. यानंतर न्यायालयाच्या आदेशाने वाळूज एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.