ETV Bharat / state

व्यसनाधीन टोळक्याचे कृत्य, एका घरासह ५ वाहने जाळली - Aurangabad

मुकुंदवाडी येथील संघर्ष नगर भागात मंगळवारी मध्यरात्री व्यसनाधीन अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने अग्नितांडव घडवून आणले. त्यांनी परास परिसरात एका घरासह ५ वाहनांना आग लावली.

व्यसनाधीन टोळक्याचा अग्निकांड एक घरासह जाळली ५ वाहने
author img

By

Published : Mar 20, 2019, 8:09 PM IST

Updated : Mar 20, 2019, 8:25 PM IST

औरंगाबाद - मुकुंदवाडी येथील संघर्ष नगर भागात मंगळवारी मध्यरात्री व्यसनाधीन अल्पवयीन मुलांच्या एका टोळक्याने अग्नितांडव घडवून आणले. त्यांनी परास परिसरात एका घरासह ५ वाहनांना आग लावली. या घटनेत सुमारे ५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

या जळीतकांडामध्ये सुभाष कुलकर्णी, आर. आर. चौधरी, नंदू चोरगे, रमेश रंगवते, रामदास लोखंडे या पाच जणांची वाहने जाळण्यात आली आहेत. तर रमेश रंगवते यांचे संपूर्ण घर आगीमध्ये जळून खाक झाले आहे. रंगवते हे सुतार काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, टवाळखोरांच्या मस्तीने त्यांच्या आयुष्यभराची कमाई क्षणात डोळ्यादेखत राखरांगोळी झाली आहे. पोलीस निरीक्षक यु. जी. जाधव यांनी पथकासह घटनास्थळी जाऊन घटनेची पाहणी केली. आरोपी अल्पवयीन असून सीसीटीव्हीच्या मदतीने त्यांचा माग काढत आहोत, असे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

व्यसनाधीन टोळक्याचा अग्निकांड एक घरासह जाळली ५ वाहने

ज्या ठिकाणी रमेश रंगवते यांचे घर जाळण्यात आले, त्या ठिकाणाहून हाकेच्या अंतरावरच संघर्ष नगर पोलीस चौकी आहे. मात्र, पोलीस चौकीत पोलीस कर्मचारीच हजर नसल्याने अनेक महिन्यांपासून चौकी ओसाड पडली आहे. या चौकीत पोलीस हजर असते. तर, अशा घटना घडल्या नसत्या. त्यामुळे पोलीस चौकी तातडीने सुरू करावी, अशी मागणी रहिवाश्यांनी केली आहे.

Intro:मुकुंदवाडी येथील संघर्ष नगर भागात मंगळवारी मध्यरात्री व्यसनाधीन अल्पवयीन मुलांच्या एका टोळीने अग्नितांडव घडून आणला परास परिसरातील पाच वाहने व एक घर या टोळक्याने जाळले या अग्नितांडवात सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने या टोळक्याचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे

Body:मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास मुकुंदवाडी भागातील संघर्ष नगर मध्ये पाच ते सहा व्यसनाधीन अल्पवयीन टवाळखोरांच्या टोळीने हाऊ घातला दिसेल त्या वाहनांना या टोळक्याने लक्ष केले या जळीत कांडा मध्ये सुभाष कुलकर्णी आर आर चौधरी नंदू चोरगे रमेश रंगवते रामदास लोखंडे या पाच जणांची वाहने जाळण्यात आली तर रमेश रंगवते यांचं संपूर्ण घर आगी मध्ये जाऊन खास झाला रंगवते हे सुतार काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते मात्र टवाळखोरांच्या मस्तीने त्यांच्या आयुष्यभराची कमाई क्षणात डोळ्यादेखत राखरांगोळी झाली या संपूर्ण जळीत कांडात 5 वा ने एक घर आल्याची माहिती मिळतात पोलीस निरीक्षक यु जी जाधव यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली आरोपी हे अल्पवयीन असून सीसीटीव्हीच्या मदतीने आम्ही त्यांचा माग काढत आहोत अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक जाधव यांनी दिली

Conclusion:ज्या ठिकाणी रमेश रंग गोटे यांचे घर जाळण्यात आलं त्याच्या हाकेच्या अंतरावर ती संघर्ष नगर पोलिस चौकी आहे मात्र पोलीस चौकित पोलिसच कर्मचारीच हजर नसल्याने अनेक महिन्यापासून ती चौकी ओसाड पडली आहे.या चौकीत पोलीस हजर असते तर अशा घटना घडल्या नसत्या ती पोलीस चौकी तातडीने सुरू करावी व गुंडांच्या टोळी कडून संरक्षण मिळावे अशी मागणी रहीवाश्यानी केली.
Last Updated : Mar 20, 2019, 8:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.