ETV Bharat / state

अमरावतीत अंध विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी; तरुणांचा उपक्रम

शहरातील स्वराज्य प्रतिष्ठान, दिशा बहुउद्देशीय संस्था, साद फाऊंडेशन आणि वनमाला बहुद्देशीय संस्थेच्यावतीने अंध विद्यार्थ्यांसाठी होळीचे आयोजन करण्यात आले. अनेक अंध मुलांनी या उपक्रमाच्या माध्यमातून होळीचा आनंद लुटला.

visually challenged children
अंध विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी
author img

By

Published : Mar 10, 2020, 9:56 AM IST

Updated : Mar 10, 2020, 10:07 AM IST

अमरावती - अंध विद्यार्थ्यांच्या जीवनात विविध रंगांची उधळण व्हावी, या उद्देशाने अमरावती शहरातील तरुणांनी नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयातील विद्यार्थ्यांसोबत होळी साजरी केली. स्वराज्य प्रतिष्ठान, दिशा बहुउद्देशीय संस्था, साद फाऊंडेशन आणि वनमाला बहुद्देशीय संस्थेच्यावतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

अमरावतीत अंध विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी

नरेंद्र भिवापूरकर शाळेतील अंध विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांना रंग लावण्यात आला. रंगाबाबत माहितीही या विद्यार्थ्यांना देण्यात आली. हे चिमुकले विद्यार्थी होळी निमित्त विविध रंगाने माखून निघाले होते. विविध आयोजक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी देखील एकमेकांना रंग लावून होळीच्या शुभेच्छा दिल्या.

हेही वाचा - मुंबईत होळीचा उत्साह, कोळीवाड्यात पारंपरिक पद्धतीने साजरी होते होळी

कोरडे रंग वापरून ही इको-फ्रेंडली होळी साजरी करण्यात आली. श्रद्धा पाटील, प्रियंका जगताप, सपना पवार, मनिष जगताप, शेखर जोशी, भूषण काळे, निखील गाले, भूषण यादगिरे, शुभम चरडे, अनिकेत ठाकरे यांनी या उपक्रमात सहभागी झाले होते.

Last Updated : Mar 10, 2020, 10:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.