अमरावती - विद्यार्थ्यांनी नेहमी फिट व निरोगी राहावे या उद्देशाने अमरावती जिल्ह्यातील जुना धामणगाव येथील डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल यांच्या वतीने आज (शनिवारी) भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अमेरिकेतील प्रख्यात युवा व्याख्याते विल हॅरीस व आयपीएस अधिकारी कुमार चिंता यांच्या प्रमुख उपस्थितीत या मॅरेथॉन स्पर्धेला सकाळी आठ वाजता सुरवात झाली. तीन किलोमीटर अंतर असलेल्या या मॅरेथॉन स्पर्धेत हजारो विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला होता.
हेही वाचा - अजित पवारांचे सोयरेच म्हणतात.. महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी
विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य,परेड,मल्लखांब, फायरजम्प इत्यादी साहसी प्रात्यक्षिक सैनिकी विद्यार्थ्यांनी सादर केले. दरम्यान, युवा व्याख्याते विल हॅरीस यांचे एक दिवासीय मार्गदर्शन वर्ग घेण्यात आले. यावेळी विल हॅरीस यांनी त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध बाबी विद्यार्थ्यांना समजून सांगितल्या.
डॉ. मुकुंदराव के. पवार शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विल हॅरीस यांनी विद्यार्थ्याच्या जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा केली. इच्छाशक्तीच्या जोरावर बदल घडवण्यासाठी तत्पर व समाजसेवेतून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याची तळमळ असायला हवी. तसेच गरीब , अंध, अपंग, अनाथ अश्या गरजूंना मला भेटून त्यांना चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासाठी माझे कार्य व विद्यार्थी दैवत असल्याचे विल हॅरिस यांनी म्हटले.
यावेळी कर्नल के. पी. सिंग, संस्थेच्या उपाध्यक्षा स्नेहल घाडगे, निलेश विश्वकर्मा, सचिव शिवाजीराव पवार,आयपीएस कुमार चिंता, नगरसेवक डॉ. हेमकरण कांकरिया, गोपालजी भूत, समन्वयक प्रा. जया केने, नरेंद्र चौधरी, विक्रम कांकरिया, मनीष मुंधडा, नितीन कनोजिया, यांच्या प्रमुख उपस्थितीत अमेरिकेतील विल हॅरीस यांचे भव्य स्वागत करण्यात आले.
हेही वाचा - उद्धव ठाकरेंना सीएएची पुन्हा ओळख करून देण्याची गरज; मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावर मनीष तिवारींचे ट्वीट