ETV Bharat / state

भाजपाच्या 'त्या' प्रदेश प्रवक्त्याला चोप देणार; अमरावती शिवसेनेचा इशारा

author img

By

Published : May 28, 2021, 8:57 PM IST

भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी फुकट प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीचे विधान करणे बंद केले नाही, तर त्यांना आम्ही दिसेल तिथे त्यांचे कपडे फाडून चोप देवू, असा इशारा शिवसनेने दिला आहे.

अमरावती शिवसेना
अमरावती शिवसेना

अमरावती - उठसुठ कुठलेही वक्तव्य करून चमकोगिरी करणारे भाजपाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी फुकट प्रसिद्धीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत चुकीचे विधान करणे बंद केले नाही, तर त्यांना आम्ही दिसेल तिथे त्यांचे कपडे फाडून चोप देवू, असा इशारा शिवसनेने दिला आहे. याबाबत शिवसेना महानगर प्रमुख पराग गुढधे, माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवराय कुळकर्णी यांना सभ्यपणे राहण्याचा सल्ला दिला आहे.

'आमदार, महापौरांजवळ कुळकर्णीची चालत नाही का?'

हिंदू स्मशानभूमीत तिसरी शवदाहिनी ही भाजपाचे विधान परिषद सदस्य प्रवीण पोटे यांनी स्वतः दिलेल्या निधीतून लावली जात आहे. भाजपाचा आमदार शवदाहिनी देतो, भाजपाचा प्रवक्ता त्याला विरोध करतो. इथे तोंडाला पट्टी बांधून आंदोलन करणाऱ्या शिवराय कुळकर्णीला स्मशानभूमीसमोर चमकोगिरी करण्यापेक्षा त्यांच्या आमदार , महापौराला जाब का विचारीत नाही. त्यांच्याजवळ यांची चलती नाही का? असा सवालही पराग गुढधे यांनी उपस्थित केला आहे.

'पाच वर्षात स्मशानभूमीचा विकास नाही'

अमरावती शहरात पाच वर्षे भाजपाचे आमदार होते. विकासपुरुष अशी त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांनी पाच वर्षात एकही स्मशानभूमी विकसीत केली नाही. महापालिकेत पाच वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. असे असताना शहरातील 14 पैकी इतर 13 स्मशानभूमीचा विकास का झाला नाही? यावरही शिवराय कुळकर्णी यांनी उत्तर द्यायला हवे.

'तिसऱ्या शवदाहिणीला सद्या इतरत्र पर्याय नाही'

शहारातील केवळ एकच स्मशानभूमी विकसीत आहे. तिथे सर्व सुविधा आहे. यामुळेच प्रवीण पोटे यांनी तिथे शवदाहिनीसाठी रक्कम दान दिली. सद्यपरिस्थिती पाहता एकाच स्मशानभूमीत शवदाहिनी सुरक्षित राहू शकते. त्या भागातील नागरिकांना निश्चितच त्रास होतो आहे. पण इतर स्मशानभूमीचा योग्य विकास होईपर्यंत तिसऱ्या शवदाहिनीला इतरत्र पर्याय नाही, असे पराग गुढधे म्हणाले.

हेही वाचा-Maratha reservation - संभाजी राजे शिवराज्याभिषेकदिनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट करणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.