ETV Bharat / state

Happy New Year : पोलीस आयुक्तांनी केक कापून केले नववर्षाचे स्वागत

अमरावतीत नववर्षाच्या पूर्वसंध्येला पोलिस आयुक्तांनी केक कापून नववर्षाचे स्वागत ( Commissioner of Police welcomed the New Year by cutting the cake ) केले. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Commissioner of Police Navinchandra Reddy ) यांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात नुतन वर्षाचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी अमरावती शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त ( Tight police presence in Amravati city ) होता.

Heavy police presence in Amravati city
पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त
author img

By

Published : Jan 1, 2023, 8:04 PM IST

पोलीस आयुक्तांनी केक कापून केले नववर्षाचे स्वागत

अमरावती - नववर्षानिमित्त अमरावती शहरातील रस्त्यांवर पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्त ( Tight police presence in Amravati city ) होता. शहरात कुठेही नववर्षाच्या पर्वावर गोंधळ, धिंगाणा असे प्रकार समोर आले नाहीत. शहराचे नवे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी ( Commissioner of Police Navinchandra Reddy ) यांनी राजापेठ पोलीस ठाण्याच्या आवारात केक कापून नऊ वर्षाचे जल्लोषात ( Commissioner of Police welcomed the New Year by cutting the cake ) स्वागत केले.

शहरातील सर्व उड्डाणपूल होते बंद - अमरावती शहरातील गाडगे नगर ते जिल्हा क्रीडा संकुल या उड्डाणपुलासह इर्विन चौक ते राजापेठ आणि राजापेठ ते कुठे बस स्टॉप तसेच फरशी स्टॉप कडे जाणारा उड्डाण पुलावरील मार्ग वाहतुकीसाठी दुपारपासूनच बंद ठेवण्यात आला होता. या उड्डाण पुलावर भरधाव वेगात दुचाकी चालून तरुणाई धिंगाणा घालत असल्यामुळे हे उड्डाणपूल पोलिसांनी बंद केले होते.

वाहन चालवणाऱ्यांची चौकशी - नववर्षाच्या पूर्व संधीला दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांची कसून चौकशी करण्यात आली. वाहन चालक दारू पिले की नाही याची तपासणी करण्यात आली. जे दारू पिऊन वाहन चालवताना आढळले त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य चौकांसह सर्वच रस्त्यांवर दुचाकींसह सर्वच वाहनांचा वेग मर्यादित राहावा यासाठी ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले होते.

एक हजार पोलिसांचा बंदोबस्त - 31 डिसेंबरच्या रात्री शहरात कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहराच्या विविध भागात एकूण 1000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता. शहरातील राजकमल चौक,राजापेठ, इर्विन चौक, गाडगे नगर, शेगाव नाका, कठोरा नाका, चपराशी पुरा, चित्रा चौक, इतवारा बाजार, पठाण चौक, तपोवन गेट परिसर, साईनगर, बडनेरा, यशोदा नगर, दस्तूर नगर ,गोपाल नगर ,रवी नगर अशा शहरातील सर्वच भागात पोलिसांचा कडे कोड बंदोबस्त लावण्यात आला होता.

पोलीस आयुक्त ही रस्त्यावर - 31 डिसेंबरच्या रात्री शहरात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी 1000 पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला असताना स्वतः पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी हे देखील रस्त्यावर उतरले होते. शेगाव नाका, पंचवटी, इर्विन चौक राजकमल चौक, राजापेठ, नवाथे चौक, या परिसरात स्वतः पोलीस आयुक्तांनी भेट देऊन बंदोबस्ताची पाहणी केली.

राजापेठ पोलीस ठाण्यात जल्लोष - रात्री बारा वाजता अमरावती शहरात नववर्षाच्या स्वागतासाठी सर्वत्र फटाक्यांची आताचबाजी झाली. यानंतर रस्त्यावरील गर्दी शांत झाली असताना राजापेठ पोलीस ठाण्यात स्वतः पोलीस आयुक्तांनी केक कापून नववर्षाचे स्वागत करीत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अल्पोपाराचा कार्यक्रम देखील ठेवण्यात आला होता. पोलीस आयुक्तांनी स्वतः यावेळी सर्वांनाच नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या. यासह येणाऱ्या नव्या वर्षात शहरात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पोलीस दक्ष राहतील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.