अमरावती - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रविवारी संपूर्ण देशभरात जनता कर्फ्यू पाळण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते. त्यामुळे रविवारचा संपूर्ण दिवस नागरिकांनी घरात राहून जनता कर्फ्यूला प्रतिसाद दिला. खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवला. तसेच स्वत: चुलीवर स्वयंपाक आणि भाकरी बनवल्या. त्यांचा हा व्हिडिओ समोर आला आहे.
नवनीत राणा यांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी झटणारे डॉक्टर, नर्स, पोलीस प्रशासन यांचेही आभार यावेळी मानले.
हेही वाचा -जनता कर्फ्यू : एसटी बसमध्ये शुकशुकाट, वाशिम - अमरावती बसमध्ये फक्त ६ प्रवासी
खासदार नवनीत राणा या नेहमी आपल्या आगळ्या वेगळ्या कार्यपद्धतीमुळे चर्चेत राहत असतात. काही दिवसांपूर्वीच मेळघाटात त्यांनी होळी निमित्त केलेले अदिवासी नृत्य, दुचाकीने केलेला प्रवास यामुळे त्या चर्चेत होत्या.
आता सध्या जगभरासह देशावर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन सरकार ने केले आहे. अशातच नवनीत राणा यांनी सुद्धा घराबाहेर न पडता कुटुंबासोबत वेळ घालवला. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.
हेही वाचा -'जनता कर्फ्यू'ला सर्वांनी प्रतिसाद द्यावा, ही बंदी नव्हे संधी - नवनीत राणा