अमरावती- वातावरणात बदल होऊन शहरात रविवारी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. अमरावतीकरांमध्ये वादळामुळे काही काळ भितीचे वातावरण निर्माण झाले होत. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
रविवारी दिवसभर कडाक्याचे ऊन होते. मात्र, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक जोरदार वादळ आले. धुळ मिश्रीत वादळाने शहरावर काळोख पसरला होता. त्यानंतर पावसाला सुरुवात झाली. वादळी पावसासोबत विजांचा कडकडाटाही सुरू होता. त्यामुळे वादळाने संपूर्ण शहरातील वीज पुरवठा खंडीत झाल्याने सर्वत्र अंधार पसरला होतो.