ETV Bharat / state

Chitra Wagh : शिंदे-फडणवीस सरकारचे महिलांसाठी चांगले काम - चित्रा वाघ - चित्रा वाघ

शिंदे-फडणीस सरकार ( Shinde Fadnavis government ) महिलांसाठी चांगले काम ( Good work by Shinde Fadnavis government for women ) करीत असल्याचा विश्वास चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी व्यक्त केला आहे. त्या महिला अमरावतीत महिला मेळाव्यात बोलत होत्या.

Chitra Wagh
Chitra Wagh
author img

By

Published : Nov 10, 2022, 6:38 PM IST

अमरावती : महिला सुरक्षा ही फक्त कागदावर नसून त्यासाठी शिंदे- फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) उत्तम काम ( Good work by Shinde Fadnavis government for women ) करीत असल्याचा विश्वास भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशध्यक्षा चित्रा वाघ ( Chitra Wagh ) यांनी व्यक्त केला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित महिला मेळाव्यास उपस्थित राहण्यासाठी त्या अमरावती येथे आल्या असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आता आम्ही सरकारमध्ये असल्याने आमची जबाबदारी शंभर पटीने वाढलेली आहे. परंतु माझ्या भूमिकेत मात्र त्यामुळे बदल झाला नाही असे त्या म्हणाल्या.

पूजा सावंत प्रकरण - महाराष्ट्र विकास आघाडी मध्ये मंत्री असलेले संजय राठोड यांना पूजा चव्हाण प्रकरणात राजीनामा द्यावा लागला होता परंतू तेच मंत्री आताच्या सरकारमध्ये आहे यावर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, पूजा सावंत प्रकरणात आ. संजय राठोड यांना तत्कालीन सरकारने कोणत्या आधारावर क्लीन चिट दिली हे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना विचारायला पाहिजे.

महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे - संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकाराला आधी कुंकू लाव नंतरच माझ्याशी बोल असे वक्तव्य केले होते याविषयी पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला असता, महिलांनी काय घालावं आणि काय घालू नये हे महिलांचे स्वातंत्र्य असल्याचं त्यांनी सागितलं. आज महिलांना सर्वच क्षेत्रात स्वातंत्र्य आहे. पुरुषांसोबत महिला खांद्याला खांदा लावून काम करत आहे. महिलांबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे हे योग्यच नसल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितलं.

अब्दुल सत्तार यांचे समर्थन नाहीच - कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा मी समर्थन करत नाही. महिला ती कोणीही असो तिचा योग्य तो सन्मान राखलाच गेला पाहिजे हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे. केतकी चितळे या तरूणीचा काही एक गुन्हा नसतांना विनाकारण एक महिना एक महिना तुरुंगात डांबले गेले होते. पत्राचाळ प्रकरणात आरोप असलेले खा.संजय राऊत यांच्याबाबत ईडीवर न्याव्यवस्थेने ताशेरे ओढलेत या विषयावर पत्रकारांनी लक्ष वेधले असता, ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. तसेच न्याव्यवस्थेवर आपला पुर्ण विश्वास असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.