अमरावती - मेळघाटातील हरीसाल येथे वनपरिक्षेत्र अधिकारी पदावर दबंग कामगिरी बजावत असलेल्या आर एफ ओ दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केली होती. पोलिसांना मिळालेल्या सुसाईट नोटवरून dfo शिवकुमार याला नागपूर वरून अटक करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान दिपालीच्या आईने शिवकुमारला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली असताना सम्पूर्ण महाराष्ट्र राज्यातून वनविभागाच्या दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली गेली. जो पर्यंत कारवाई होत नाही तो पर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचे नातेवाईक म्हणाले. यावेळी विनोद शिवकुमार यांचे निलंबन करून श्रीनिवास रेड्डी यांची उचलबागली करण्यात आली. त्यानंतर रात्री उशिरा दीपाली चव्हाण यांच्यावर मोरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दीपाली चव्हाणच्या परिवाराचे सांत्वन करून श्रद्धांजली वाहिली.