ETV Bharat / state

अमरावतीत अज्ञात व्यक्तींचा वकिलाच्या वाहनावर हल्ला - advocate car attack amravati

हल्ला कोणी केला असावा याची मला माहिती नाही माझा वैयक्तिक कोणीही शत्रू नाही. मात्र, वकील म्हणून मी अनेक मोठ्या लोकांच्या विरोधात खटला लढतो आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणी केला असावा हे मला ठाऊक नाही, असे अ‌ॅड. राजेश मुंदडा यांनी सांगितले.

ad. rajesh mundhada amravati
अ‌ॅड. राजेश मुंदडा आणि त्यांची कार
author img

By

Published : Mar 11, 2020, 10:48 PM IST

अमरावती- तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन दुचाकीस्वारांनी वकिलाच्या वाहनावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना सोमवारी रात्री गर्ल्स हायस्कूल चौक ते मालटेकडी दरम्यान घडली. या हल्ल्यात कारच्या काचेला तडा गेला असून समोरची एक लाईट फुटली आहे. अ‌ॅड. राजेश मुंदडा यांच्या वाहनावर हा हल्ला झाला आहे.

माहिती देताना अ‌ॅड. राजेश मुंदडा

सोमवारी धुळवडीच्या दिवशी रात्रीच्या वेळी वकील राजेश मुंदडा हे गाडगे नगर येथून घरी जात होते. दरम्यान, गर्ल्स हायस्कूल चौकात त्यांच्या विरुद्ध दिशेने एक दुचाकी भरधाव वेगात आली. दुचाकीवर चेहऱ्याला कापड बांधलेले दोघेजण स्वार होते. या दुचाकीस्वारांनी राजेश मुंदडा यांच्या कारच्या काचेवर रॉड मारला. यानंतर राजेश मुंदडा यांनी कारचा वेग कमी केला असता, दुचाकीस्वार कारच्या दुसऱ्या बाजूने आले आणि त्यांनी परत रॉडने वार करून कारचा समोरचा लाईट फोडला. दरम्यान, राजेश मुंदडा यांनी कारचा वेग वाढवला आणि ते थेट पोलीस आयुक्तालय समोरून फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले. अ‌ॅड. राजेश मुंदडा हे फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचल्यामुळे दुचाकीस्वारांनी पळ काढला.

राजेश मुंदडा यांनी झालेल्या प्रकाराची माहिती फ्रेझरपुरा पोलिसांना दिली. घटना गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दित घडल्याने मुंदडा यांनी रात्री गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन झाल्या प्रकाराची तक्रार नोंदवली. हा हल्ला कोणी केला असावा, याची मला माहिती नाही. माझा वैयक्तिक कोणीही शत्रू नाही. मात्र, वकील म्हणून मी अनेक मोठ्या लोकांच्या विरोधात खटला लढतो आहे. मात्र, हा प्रकार नेमका कोणी केला असावा हे मला ठाऊक नाही, असे अ‌ॅड. राजेश मुंदडा यांनी सांगितले.

हेही वाचा- विद्यापीठासाठी शासनाने दिलेली जमीन गेली बिल्डरच्या घशात!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.