ETV Bharat / state

जमील कॉलनी परिसरात विद्यार्थ्यांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रकार सीसीटीव्हीत कैद

मदरशाकडे जाणाऱ्या विद्यार्थ्याचे एका दुचाकीस्वाराकडून अपहरण करुन पळवण्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून मुलाने अपहरणकर्त्याच्या तावडीतून स्वत:ला सोडवित तेथून पळ काढला.

विद्यार्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न
author img

By

Published : Jul 12, 2019, 3:56 PM IST

अमरावती - बुधवारी सायंकाळी जमील कॉलनी परिसरात मदरशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचा एका दुचाकीस्वाराने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेमुळे जमील कॉलनी, बिस्मिल्ला नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

विद्यार्त्याच्या अपहरणाचा प्रयत्न

मोहम्मद जावेद मोहम्मद शकील हा ज्ञानमाता हायस्कूलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता जमील कॉलनी येथील मदरशात जात होता. यावेळी एका अनोळखी दुचाकीस्वाराने त्याला पेट्रोलपंप कुठे आहे असे विचारले. मोहम्मदने पेट्रोलपंप समोर असल्याचे सांगितल्यावर दुचाकीस्वाराने त्याला दुचाकीवर बसायला सांगितले. नंतर मदरसा आल्यानंतर मुलाने मला उतरायचे आहे असे सांगितले. तरीही दुचाकीस्वाराने दुचाकी थांबवली नसल्याने त्याने दुचाकीवरून उडी मारत पळण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुचाकीस्वाराने त्याला पकडले व मारहाण करायला सुरुवात केली. मुलाने कसेबसे स्वत:ला सोडवत तेथून पळ काढला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला.

मोहम्मद जावेदचे वडील मोहम्मद शकील यांनी या प्रकरणाची तक्रार नागपुरी गेट पोलीस ठाण्याला दिली. पोलिसांनी अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून त्या अनोळखी दुचाकीस्वाराचा शोध घेणे सुरु आहे.

Intro:( सीसीटीव्ही फुटेज मेलवर पाठवतो) बुधवारी सायंकाळी मदारशामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यास जमिल कॉलनी परिसरात एका दुचाकूस्वाराने अपहरण करण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून या घटनेमुळे जमिल कॉलनी, बिस्मिल्ला नगर परिसरात खळबळ उडाली आहे.

Body:मोहम्मद जावेद मोहम्मद शकील हा ज्ञानमाता हायस्कुलमध्ये पाचव्या इयत्तेत शिकणारा विद्यार्थी बुधवारी सायंकाळी 7.30 वाजता जमिल कॉलनी येथील मदरशात जात असताना एक अनोळखी दुचाकीस्वाराने त्याला पेट्रोलपंप कुठे आहे असे विचारले. मोहम्मद जावेदने पेट्रोलपंप समोर असल्याचे सांगितल्यावर दयचाकूस्वराने त्याला दुचाकीवर बसायला सांगितले. दरम्यान मदरसा आल्याने मोहम्मद जावेद याने मला उतरायचं असं संगीतल्यावरही दुचाकूस्वाराने दुचाकी थांबवली नसल्याने मोहम्मर जावेदने दुचाकूवरून उडी मारली. यानंतर दुचाकूस्वरने मिहम्मद जावेद याला मारहाण केली असता मोहमद पळून गेला. हा संपुर्ण प्रकार सीडीटीव्हीमध्ये कैद झाला. दरम्यान मोहम्मद जावेदचे वडील मोहम्मद शकील यांनी या प्रकरणाची तक्रार नागपुरीगेट पोलीस स्टेशनला दिली. पोलिसांनी ओहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला. अनोळखी दुचकूस्वराचा शोध पोलीस घेत आहेत.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.