अमरावती: यानिमित्त नद्यांची परिक्रमा यात्रेचाही प्रारंभ झाला. (Aiming to revive rivers) उपवनसंरक्षक चंद्रशेखरन बाला, चंद्रभागा नदी समन्वयक अरविंद नळकांडे, पिंगळाई नदी समन्वयक गजानन काळे, राजीव अंबापुरे आदी उपस्थित होते. (under Let go to river initiative Amaravati) नदी संवाद यात्रा दि. १२ ते २३ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. (Jalpuja of Pinglai river) अधिकाधिक नागरिकांनी अभियानात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी केले. (Latest news from Amravati)
नदी समस्यांच्या उपाययोजनेसाठी अभियान : गेल्या काही वर्षात कधी अनावृष्टी व कधी अतिवृष्टी असे पर्जन्यमान होत आहे. पूर आणि दुष्काळासारख्या समस्या उद्भवत आहेत. वाढते नागरीकरण व औद्योगिकीकरणामुळे उपलब्ध पाण्यावरील ताण वाढला आहे. प्रदूषणामुळे भूजलाची उपयुक्तता घटत आहे. गाळामुळे नद्यांची वहन व साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे नद्यांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याचे चंद्रभागा नदी अभियानाचे समन्वयक नळकांडे यांनी सांगितले.
या अधिकाऱ्यांवर अभियानाची जबाबदारी : जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या अध्यक्षतेखाली याबाबत बैठक होऊन जिल्हास्तरीय समिती यापूर्वीच गठित करण्यात आली आहे. नोडल अधिकारी आणि समन्वयकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. चंद्रभागा नदीसाठी नळकांडे यांची समन्वयक म्हणून आणि चिखलदरा, अचलपूर व दर्यापूरच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खोलाड नदीसाठी नदी समन्वयक अंबापुरे व नोडल अधिकारी चांदूर रेल्वेचे एसडीओ, तसेच पिंगळाई नदीसाठी समन्वयक काळे व नोडल अधिकारी तिवसा एसडीओ आहेत.
या कामांवर असणार भर : अभियानात नदी संवाद यात्रा, नदीसाक्षरता वाढविणे, नदीचा तट, प्रवाह, जैवविविधतेबाबत जागृती, नदी खो-यांचे नकाशे, पूररेषा, पाणलोट क्षेत्राचे नकाशे, मातीचे क्षरण, पूर व दुष्काळ, अतिक्रमण, शोषण, प्रदूषण या तीन प्रमुख कारणांचा अभ्यास व त्याचा परिणाम अभ्यासणे आदी कामे करण्यात येणार आहेत, असे नळकांडे यांनी सांगितले.