ETV Bharat / state

अमरावती जिल्ह्यातील १००% लसीकरण केंद्रांना टाळे; लसीचा तुटवडा

author img

By

Published : Apr 26, 2021, 12:08 PM IST

लसी मिळाल्यास दुपारनंतर महानगरपालिका क्षेत्रातील काही मोजकेच लसीकरण केंद्र सुरू होण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी व्यक्त केला आहे.

अमरावती जिल्ह्यातील १००% लसीकरन केंद्रांना टाळे

अमरावती - राज्यात कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा हा कायम आहे. अमरावती जिल्ह्यातही पुन्हा कोरोना लसींचा पुरवठा खंडित झाल्याने जिल्ह्यातील 100% लसीकरण केंद्र बंद झाले आहे. त्यामुळे कोरोना लसीकरणासाठी आलेल्या लोकांना आल्यापावली परत जावे लागत असल्याचे चित्र सध्या अमरावतीमध्ये पाहायला मिळत आहे.

मोजकेच लसीकरण केंद्र सुरू होण्याचा अंदाज

दरम्यान आज(सोमवारी) दुपारपर्यंत वीस ते पंचवीस हजार लसी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे . लसी मिळाल्यास दुपारनंतर महानगरपालिका क्षेत्रातील काही मोजकेच लसीकरण केंद्र सुरू होण्याचा अंदाज जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर दिलीप रणमले यांनी व्यक्त केला आहे.

सध्या राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्यासाठी राज्य सरकारचा भर असला तरी प्रत्यक्षात मात्र लसीचा तुटवडा कायम आहे. त्यामुळे लोकांना लसीकरण केंद्रावरून आल्या पावली परत जावे लागत आहे. परिणामी या तुटवाड्याने नागरिकांनी केंद्र सरकारवर रोष व्यक्त केला आहे.

सध्या 6238 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार चालू

सोमवारी अमरावती जिल्ह्यात नव्याने 685 कोरोना बाधित आढळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा हा 61165 वर पोहचला असून आतापर्यंत 53858 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या 6238 रुग्णावर विविध रुग्णालयात उपचार चालू आहे.दरम्यान जिल्ह्यात आतापर्यंत 797 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.