अकोला - एमआयडीसीतील क्रमांक 3 च्या न्यु विदर्भ ट्रेडिंग बेसन फॅक्ट्रीला आज पहाटे भीषण आग लागली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी ही आग नियंत्रणात आणली.
तीन तासांच्या प्रयत्नानंतर आग नियंत्रणात -
एमआयडीसीतील बेसन फॅक्ट्रीला पहाटे अचानक आग लागली. आग लागल्याने तिथे असलेल्या कर्मचाऱ्यांची एकच धावपळ उडाली. या कामगारांनी आगीची माहिती मालक, पोलीस आणि अग्निशमन दलास दिली. तब्बल दोन ते तीन तासांनंतर आग विझविण्यात अग्निशमन दलास यश आले. मात्र, ही आग पुन्हा पुन्हा भडकत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना अतिरिक्त फेऱ्या माराव्या लागल्या. सुदैवाने या आगीत कुठलीही जिवीतहानी झाली नाही. या आगीत किती नुकसान झाले व आग कशामुळे लागली हे स्पष्ट झाले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पुढील कारवाई सुरू आहे.
हेही वाचा - सोलापूर-पुणे महामार्गावर रुग्णवाहिकेचा अपघात; एकाच कुटुंबातील 3 ठार, 13 जण जखमी
बेसन, चणाडाळ व मशीन जळून खाक -
फॅक्ट्रीला लागलेल्या या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे. या आगीत बेसन, चणाडाळ ही मोठ्या प्रमाणात जळाली असून येथे असलेल्या मशीनदेखील पूर्णपणे जळाल्या आहेत.
हेही वाचा - देशभरात अशा प्रकारे साजरी होत आहे दिवाळी; पाहा एका क्लिकवर..