ETV Bharat / state

कोपरगाव तालुक्यातील दोन विद्यार्थ्यांनी तयार केले 'शेअरिंग अ‌ॅप'

author img

By

Published : Aug 25, 2020, 2:46 PM IST

चांदेकसारे येथील सर्वेश सुभाष होन व जयेश संजय देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी एक शेअरिंग अ‌ॅप तयार केले. त्यांनी या अ‌ॅपचे नाव 'शेअरकर' असे ठेवले आहे. हे दोघेही कोपरगावच्या संजीवनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत.

Jayesh Deshmukh and Sarvesh Hon
जयेश देशमुख आणि सर्वेश होन

अहमदनगर - कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला होता. या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी वेळेचा सदुपयोग करत आपल्या अंगी असणाऱ्या कला-गुणांना वाव दिला. तर काहींनी कौशल्याच्या जोरावर समाज उपयोगी साधने तयार केले. असाच एक प्रयत्न कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील सर्वेश सुभाष होन व जयेश संजय देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी केला. सर्वेश व जयेश या दोघांनी मिळून एक शेअरिंग अ‌ॅप तयार केले आहे.

त्यांनी या अ‌ॅपचे नाव 'शेअरकर' असे ठेवले आहे. हे दोघेही कोपरगावच्या संजीवनी पॉलिटेक्निक महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. सरकारने चिनी बनावटीच्या 59 अ‌ॅपवर बंदी घातली. त्यामध्ये 'शेअर इट' आणि 'झेंडर' या दोन शेअरिंग अ‌ॅपचाही समावेश होता. त्यामुळे आता फोटो, फाईल्स, व्हिडिओ आणि गाणी शेअर करण्यासाठी कोणते अ‌ॅप वापरावे, असा प्रश्न अनेकांना पडला. हाच विचार करून या दोन मुलांनी 'शेअरकर' अ‌ॅप तयार केले.

चांदेकसारे येथील सर्वेश सुभाष होन व जयेश संजय देशमुख या दोन विद्यार्थ्यांनी अ‌ॅप तयार केले

मोबाईल धारकांना शेअरिंग करण्यासाठी हे अ‌ॅप उपयोगी पडणार आहे. सध्या ते प्लेस्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. सर्वेश आणि जयेश यांनी अवघ्या पंचवीस दिवसात हे अ‌ॅप तयार केले. दहा दिवसात 350 हून अधिक मोबाईल धारकांनी ते इन्स्टॉल केले आहे. हे अ‌ॅप वापरण्यासाठी सोपे असल्याने मोबाईल धारकांना आवडत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एखादे भारतीय बनावटीचे अ‌ॅप तयार करण्याची इच्छा या दोघांची होती. चिनी बनावटीच्या अ‌ॅपवर आलेली बंदी हीच संधी समजत त्यांनी शेअरकर अ‌ॅप तयार केले.

जयेश देशमुख आणि सर्वेश होन यांनी तयार केलेले शेअरिंग अ‌ॅप हे पूर्णत: भारतीय असून वापरण्यास अत्यंत सोपे, सुरक्षित व फ्री आहे. हे वापरताना इंटरनेट व हॉटस्पॉटची गरज नाही, एक्सल फाईल, पिक्चर, व्हिडिओ आणि इतर फाईल फक्त काही मिनिटात शेअर होतात. अ‌ॅप डाऊनलोड करण्यासाठी फक्त चार एम बी डेटा लागतो. चीनी बनावटीच्या अ‌ॅप्सवर बंदी घालण्यात आल्याने तरुणांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. चांगले अ‌ॅप्लिकेशन्स तयार केले तर त्याचा समाजाला उपयोग होईल, असे मत सायबर तज्ञ तन्मय दीक्षित यांनी व्यक्त केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.