ETV Bharat / state

अहमदनगरमध्ये तृतीयपंथीयांनी बजावला आपला मतदानाचा हक्क

author img

By

Published : Apr 23, 2019, 5:37 PM IST

अहमदनगर शहरातील जवळपास १२८ तृतीयपंथीयांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला.

तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावताना

अहमदनगर - शहरातील जवळपास १२८ तृतीयपंथीयांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी ज्या कोणत्या पक्षाचे सरकार येईल त्यांनी आम्हाला आरक्षण द्यावे, अशी मागणीही केली.

तृतीयपंथीय मतदानाचा हक्क बजावताना

अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात आज निवडणूक पार पडत आहे. त्यामुळे आज शहरातील तृतीयपंथीयांनी मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी केली होती. यावेळी तृतीयपंथी संघटनेच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या काजल गुरू यांनी सांगितले, की आम्ही लोकशाहीचा आदर ठेवत मतदान केले असून इतरांनीही मतदान करावे, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.

उमेदवार निवडणुकीत जी आश्वासने देतो ती त्याने निवडून आल्यावर पूर्ण करावीत, अशी अपेक्षा आम्हाला आहे. तसेच सरकार कुणाचेही निवडून येवो, आम्हाला मात्र येणाऱ्या सरकारकडून आरक्षण हवे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

Intro:अहमदनगर- तृतीय पंथीयांनी बजावला आपला मतदानाचा हक्कBody:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे

अहमदनगर- तृतीय पंथीयांनी बजावला आपला मतदानाचा हक्क.. जे ही सरकार येईल त्यांनी आम्हाला तृतीयपंथीयांना द्यावे आरक्षण.. केली मागणी

अहमदनगर- अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघात शहरातील जवळपास 128 तृतीयपंथीयांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.. तृतीयपंथी संघटनेच्या पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्त्या काजल गुरू यांनी सांगितले की आम्ही लोकशाहीचा आदर ठेवत मतदान केले आहे, त्यामुळे इतरांनीही मतदान करावे आणि आपला हक्क बजवावा. तसेच उमेदवार निवडणुकीत जे आश्वासने देतो ते त्याने निवडून आल्यावर पूर्ण करावेत अशी आम्हाला अपेक्षा आल्याचे काजल यांनी सांगितले. सरकार कुणाचेही निवडून येवो, मात्र आम्हाला येणाऱ्या सरकार कडून आरक्षण हवे असल्याची मागणी काजल गुरू यांनी यांनीं केली..Conclusion:अहमदनगर- तृतीय पंथीयांनी बजावला आपला मतदानाचा हक्क
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.