ETV Bharat / state

साईनगरीत साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात

author img

By

Published : Aug 10, 2021, 5:46 PM IST

आजपासून श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट याकालावधीत हा पारायण सोहळा होत आहे.

Saisachcharit Parayan
शिर्डीत साईसच्चरित पारायण सोहळ्याला सुरुवात

शिर्डी - श्री साईबाबा संस्थान, नाट्य रसिक मंच आणि शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याला आरंभ झाला. कोविडच्या पार्श्वभूमीवर हे पारायण आभासी पद्धतीने होत आहे. ९ ऑगस्ट ते १६ ऑगस्ट याकालावधीत हा पारायण सोहळा होत आहे.

सकाळी श्रीसाईसच्चरित ग्रंथाची समाधी मंदिरातून गुरुस्थान व द्वारकामाईमार्गे स्टेजपर्यंत मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत संस्थानचे सीईओ कान्हूराज बगाटे यांनी विणा, डेप्युटी सीईओ रविंद्र ठाकरे यांनी पोथी, मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा व मंदिर पुजारी दिगंबर कुलकर्णी यांनी कलश घेवून सहभाग घेतला. यावेळी संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी व पुजारी उपस्थित होते. मिरवणूक पारायण मंडपात आल्यानंतर सीईओ बगाटे यांच्या हस्ते ग्रंथ व कलश पूजन करुन श्रीसाईसच्चरित पारायण वाचनाचा शुभारंभ करण्यात आला.

मंदिर पुजारी बाळासाहेब जोशी व दिंगबर पुजारी यांच्यामार्फत सकाळी ७ ते ११.३० यावेळेत श्री साईसच्चरिताचे अध्याय वाचन करण्यात आले. या पारायण सोहळ्याचे संस्थानचे फेसबुक, वेबसाईट व यु ट्युब यावरून थेट प्रक्षेपण करण्यात आले. भाविकांनी या बरोबरच घरोघरी श्री साईसच्चरित वाचून या पारायणात सहभाग घेतला.

हेही वाचा - पेगासस प्रकरणावर समांतर वादविवाद नको, सर्वोच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.