ETV Bharat / state

Rajnath Singh on INDIA : 'इंडिया' आघाडीची राजनाथ सिंह यांनी उडविली खिल्ली, म्हणाले...

Rajnath Singh on INDIA जग आज आपल्याला पूर्वीसारखे दुर्लक्षित न करता आपल्याकडे लक्ष देऊन पाहत आहे. अशा परिस्थितीत आपले विरोधी पक्ष मुंबईत आज पुन्हा एकदा एकत्र येत आहे. विरोधी पक्षांनी हा 'इंडिया' नावाचा कुनबा (परिवार) बनवला आहे. यांचे म्हणजे 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी परिस्थिती आहे, अशी खरमरीत टीका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केली आहे. (India Alliance of Opposition Parties) (Rajnath Singh On Oppositions Parties) (Rajnath Singh On India Party) (Rajnath Singh Visit Shirdi)

Rajnath Singh In Shirdi
राजनाथ सिंह यांचा निशाणा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 31, 2023, 9:36 PM IST

अहमदनगर (शिर्डी): देशात अनेक विरोधी पक्ष एकत्र येत आहेत. एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देशात प्रगती करत असताना जगात आज आर्थिक प्रगतीवर पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. लवकरच देश तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल, अशी अपेक्षा राजनाथ सिंह यांनी व्यक्त केली. (India Alliance of Opposition Parties) (Rajnath Singh In Shirdi) (Rajnath Singh On Oppositions Parties) (Rajnath Singh On India Party) (Rajnath Singh Visit Shirdi)

विरोधकांची उडविली खिल्ली: राजनाथसिंह आज अहमदनगर जिल्हा दौऱ्यावर असून शिर्डीमध्ये साई दर्शनानंतर त्यांनी पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील जयंती सोहळा आणि त्यानिमित्ताने आयोजित राज्यस्तरीय साहित्य-कला गौरव पुरस्कार सोहळ्यास उपस्थिती लावली. मुंबईत इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक होत असताना राज्यात आलेले केंद्रीय मंत्री राजनाथसिंह हे विरोधी पक्षांवर काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष होते. हा विषय छेडताना राजनाथसिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाहत आज मुंबईत होत असलेल्या विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा उल्लेख केलाच. अगदी मराठीत त्यांनी विरोधकांनी 'इंडिया' नाव घेतल्या बद्दल 'नाव मोठे आणि लक्षण खोटे' अशी टिपण्णी करत विरोधकांच्या एकतेला हा एक पारिवारिक 'कुनबा' असल्याचे संबोधत खिल्ली उडवली.

देशाची वेगाने प्रगती: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशाची अर्थव्यवस्था वेगाने आगेकूच करत आहे. विविध क्षेत्रात आपण प्रगती करत आहोत. 'अवघे विश्वची माझे घर' हा देशाचा मूलमंत्र आहे. शेती, सहकार, श्रमिक, कामगार, उद्योजक अशी आपली यशस्वी साखळी बनली असल्याने जगाच्या नकाशावर आज भारत एक महत्त्वपूर्ण देश बनला आहे. भारत काय म्हणतो याकडे जगाचे लक्ष लागून असते. ही सर्व प्रगती गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने केली आहे, असे सांगत विरोधी पक्ष सरकारवर करत असलेल्या विविध आरोपांना केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह उत्तर दिले.

साई समाधीचे घेतले दर्शन: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज प्रवरानगर येथील गाडगीळ सभाग्रुहा समोर उभारलेल्या भव्य शामीयानात पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील काला गौरव आणि साहीत्य पुरस्कार वितरणाचा मुख्‍य कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या आधी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आहे. यावेळी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिर्डी साईबाबांच्या पाद्य पूजा व शिर्डी माझे पंढरपूर ही छोटी साईबाबांची आरतीही केलीय. दरम्यान संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साईबाबांच्या समाधीवर लाल रंगांची मोठी चादर चढवत साई चरणी नतमस्तक झालं आहे. साईबाबांचा समाधीच्या दर्शनानंतर संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले.

राजनाथ सिंह यांचे स्वागत: केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचे साई मंदिरात आगमन झाल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, महसूल, पशुसंवर्धन दूग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा साईबाबा मूर्ती व शॉल भेट देत सन्मान केलाय. साई दर्शनानंतर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढील कार्यक्रमास प्रवरानगरकडे रवाना झाले आहे.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi Press Conference : अदानींच्या गुंतवणुकीत खरा पैसा कुणाचा? राहुल गांधींचा सवाल
  2. Political leaders Reaction on India Meeting : 'इंडिया' आघाडीच्या बैठकीतील खर्चावर मंत्री उदय सामंत यांची टिका, तर आदित्य ठाकरे म्हणाले...
  3. INDIA Alliance Meeting Mumbai : इंडियाचा पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असणार? ओमर अब्दुल्ला यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.