ETV Bharat / state

अहमदनगरच्या डोणगावातील दूध उत्पादक शेतकरी 1 ऑगस्टपासून जाणार संपावर

author img

By

Published : Jul 12, 2020, 2:31 PM IST

कोरोनाच्या काळात शेतमाल विक्रीची अडचण झाली. त्यानंतर आता पेरणी केलेले सोयाबीनचे बियाण उगवले नाही. त्यात आता दुधाला भावा नाही असे ओरडून-ओरडून शेतकरी थकला आहे. मात्र, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने अहमदनगरमधील डोणगावच्या शेतकऱ्यांनी दूध संपाचा मार्ग अवलंबला आहे.

Farmer
शेतकरी

अहमदनगर (शिर्डी) - शेती व्यवसायला जोड धंदा म्हणून दुग्धउत्पादन घेतले जाते. मात्र, आता शेतीमालासोबतच दुधालाही भाव मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अहमदनगर-औरंगाबाद जिल्ह्यातील गोदावरी नदी काठच्या डोणगाव येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी 1 ऑगस्टपासून 'दूध बंद' आंदोलन सुरू करण्याची तयारी केली आहे.

दुधाला मागणी असूनही केवळ कोरोनाच्या नावाखाली योग्य तो दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले आहे. जनावरांचा चारा आणि पशुखाद्याच्या वाढत्या खर्चाच्या ओझ्याखाली शेतकरी दबू लागला आहे. सरकारने दूध उत्पादकांचे अतिरिक्त दूध खरेदी करण्याचे आश्वासन दिले असले, तरी त्याचा फायदा गावातील दूध उत्पादकांना होत नाही. खासगी दूध संघासह जिल्हा दूध संघही या सगळ्या परिस्थितीचा गैरफायदा घेत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला प्रती लिटर 15 ते 20 रुपये भाव मिळत आहे. सरकारचे दूध उत्पादक शेतकऱ्यांकडे लक्ष नसल्याचा आरोप करत दूध उत्पादक शेतकरी संप करणार आहेत, असे डोणगाव दूध संपाचे प्रणेते धनंजय धोर्डे यांनी सांगितले. दूध उत्पादकांच्या चार मागण्या आहेत. 31 जुलैपर्यंत सरकारने याकडे लक्ष न दिल्यास 1 ऑगस्टपासून आम्ही 'दूध बंद' आंदोलन सुरू करणार असल्याचे धोर्डे यांनी सांगितले.

लॉकडाऊन पूर्वी गाईच्या दुधाचा दर प्रती लीटर 30 ते 32 रुपयापर्यंत होता. आता हा दर 18 ते 20 रुपयांपर्यंत खाली आला आहे तर म्हशीच्या दुधासाठी 32 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. फॅट कमी निघाल्यास दर त्यापेक्षाही आणखी कमी होतो. दुधाला भाव मिळत नसला तरी दुभत्या जनावरांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. एका गाईला दिवसाला किमान 2 ते 4 किलो ओला आणि सुका चारा लागतो व तेवढेच पशुखाद्य लागते. दुधाला भाव मिळत नसल्याने या संपूर्ण खर्चाचा मेळ बसत नाही. बाजारातील पशुखाद्याच्या 50 किलो वजनाच्या पोत्याचा दर हा 1 हजार 200 ते 1 हजार 400 रुपये, खापरी पेंड (50 किलो) 2 हजार 200 ते 2 हजार 400, मका भरडा (50 किलो) 800 ते 900 रुपये असे आहेत. जोपर्यंत घराचा चारा आहे तोपर्यंत ठिक नाही तर दुधाचा व्यवसायचं बंद करावा लागेल, असे डोणगाव येथील दूध उत्पादक अनिता रोकडे म्हणाल्या.

कोरोनाच्या काळात शेतमाल विक्रीची अडचण झाली. त्यानंतर आता पेरणी केलेले सोयाबीनचे बियाण उगवले नाही. त्यात आता दुधाला भावा नाही असे ओरडून-ओरडून शेतकरी थकला आहे. मात्र, त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांनी दूध संपाचा मार्ग अवलंबला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.