ETV Bharat / state

Dr Neelam Gorhe : स्वतःला बाहुबली म्हणून मिरवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री खरे कटप्पा - डॉ. नीलम गोऱ्हे

author img

By

Published : Dec 14, 2022, 10:03 AM IST

Updated : Dec 17, 2022, 10:21 AM IST

कर्नाटकचे मुख्यमंत्री खरे कटप्पा (Karnataka CM Basavaraj Bommai Katappa ) असल्याची टिका डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिर्डीत केली आहे. बसवराज बोम्मई यांनी कर्नाटकात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला बंदी घातली.

Etv Bharat
Etv Bharat

नीलम गोऱ्हे

शिर्डी : स्वतःला बाहुबली म्हणून मिरवणारे कर्नाटकचे मुख्यमंत्री खरे कटप्पा (Karnataka CM Basavaraj Bommai Katappa ) असल्याची टिका विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शिर्डीत केली आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री जनतेचा विश्वसघात करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. काही संघटनांना हातीशी धरुन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला बंदी जर मतांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री करत असतील तर ही लोकशाही योग्य नाही. याची सर्वोच्च न्यायालय दखल घेईल असा विश्वासही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला (Neelam Gorhe Criticize Basavaraj Bommai ) आहे.

कर्नाटकचे मुख्यमंत्री कटप्पा : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे मंगळवारी रात्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आल्या होत्या. यावेळी गोऱ्हे यांनी शिर्डीतील पत्रकारांशी संवाद साधला. लवकरच हिवाळी आधिवेशन सुरू होत आहेत. या आधिवेशनात अनेक सभासद प्रश्न विचारत असतात काही प्रश्न जे अनिर्णित राहातात किंवा आहेत. त्यावर मी लवकरच बैठक घेणार आहे.

मुबंईत डान्सबार सुरू : डान्सबार बंदी असूनही मुबंईत डान्सबार सुरू ( Dance Bar Open In Mumbai ) असतील तर त्यांना कोणाचे ना कोणाचा वरद हस्त असणार या संदर्भातील माहिती मला जर समजली. तर मी स्वतः दखल घेणार असल्याचे यावेळी गोऱ्हे म्हणाल्या आहेत. राज्यातील कोणताही राजकीय नेता डान्सबारच्या बाजूने नाही कारण सर्व पक्षीयांनी डान्सबार बंदीबाबत विधायक एका मताने मंजूर केला असून यासाठी कायदा ही लागू केला. काही बंधनेदेखील घालण्यात आली आहेत. डान्सबारच्या माध्यमातून अनूचित प्रकार घडतात आणि अल्पवयीन मुलींचा व्यापार देखील होतो. यामुळे अश्या मुद्यांवर मी स्वतः सामाजिक प्रतिनिधींबरोबर चर्चा करणार असून येणाऱ्या आधिवेशनात आणखी कडक धोरण आखता येईल का हा ही प्रयत्न करणार असल्याचे गोऱ्हे म्हणाल्या आहेत.

सम्रुध्दी महामार्गसाठी लक्ष घातले : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे सम्रुध्दी महामार्गसाठी खूप लक्ष घातले होते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः सम्रुध्दी महामार्गाची पाहणी केली. या महामार्गाच्या बजेटसाठी बैठका देखील घेतल्या होत्या. कोरोना काळात या सम्रुध्दी महामार्गाचे काम सुरू राहावे यासाठी प्रयत्न केले. केवळ श्रेय घेण्यासाठी महार्गाच्या शुभारंभसाठी ठाकरे कुटुंबातील कोणालाही बोलावले नाही अशी टिकाही गोऱ्हे यांनी शिंदे सरकारवर केली आहे.

Last Updated : Dec 17, 2022, 10:21 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.