ETV Bharat / state

शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक, १० किलो सोने जप्त

author img

By

Published : Mar 17, 2019, 5:20 PM IST

शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे.

धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक

अहमदनगर - शिर्डीत धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला होता. या चोरांविरोधात पोलिसांनी कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी ४ जणांना अटक करुन, चोरीला गेलेले १० किलो सोने हस्तगत केले आहे.

मोटारसायकलवर येऊन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन धुम ठोकणाऱ्या चोरांनी शिर्डीत गेल्या काही दिवसापासून धुमाकूळ घातला होता. या सोनसाखळी चोरांमुळे भाविक आणि शिर्डीकरांमध्ये भीतीचे वातावरणात निर्माण झाले होते. त्यामुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आव्हान पोलिसांपुढे होते.

अखेर ४ चोरांना गजाआड करण्यात शिर्डी पोलिसांना यश आले आहे. त्यांच्याकडून १० किलो २०० ग्रँम वजनाचे सोन्याच्या दागिण्यांसह १ मोटारसायकल असा एकूण ३ लाख ८० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या आरोपींकडून इतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगितले.

धुमस्टाईलने चोरी करणाऱ्या चोरांना अटक

शिर्डी पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी किरण छगन सोनवणे (रा. दत्तनगर कोपरगाव), नवनाथ साहेबराव गौर्डे (रा.पोहेगाव), मनोज चंद्रकांत बडोदेकर (रा. बिरोबा रोड, शिर्डी) हे दरोड्याच्या उद्देशाने शिर्डीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर सापळा लावून पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना अटक केली. दरम्यान, या आरोपींचे २ साथीदार फरार असून, पोलिसांनी सदर आरोपींविरोधात गुन्हा दाखल केली आहे. या आरोपींची विचारपूस केली असता, त्यांनी वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १८ मार्च २०१९ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

शिर्डी शहरामध्ये धुमस्टाईलने सोनसाखळी चोरांनी धुमाकुळ घातला होता या चोरां विरोधात पोलीसांनी कार्यवाही सुरु केली असुन चोरी गेलेले दहा किलो सोने हस्तगत करत चार जणांना अटक केली आहे....

मोटारसायकलवर येवुन महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरुन धुम स्टाईल चोरांनी शिर्डीत गेल्या काही दिवसा पासुन थैमान घातले होते या सोनसाखळी चोरांमुळे भाविका आणि शिर्डीकरांन मध्ये भितीचे वातावरणात निर्माण त्या मुळे या चोरांचा बंदोबस्त करण्याचे आवाहन पोलीसांपुढे असतांना शिर्डी पोलीसांनी कामगिरी करत अट्टल चार सोनसाखळी चोरांना गजाआड केले असुन त्यांच्यावकजुम विविध गुन्ह्यातील एकुण १० किलो २०० ग्रँम वजनाचे सोन्याचे दागिने आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटारसायकल असा एकुण ३ लाख ८० हजार रुपये कि.चा. मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला असुन या आरोपींकडून ईतरही अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असल्याचे शिर्डी उपविभागीय पो.अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी सांगीतलय..

BITE - सोमनाथ वाकचौरे उप विभागीय पोलीस अधिकारी शिर्डी

मागील काही दिवसानंपासुन शिर्डी शहरात धुम स्टाईलने मोटारसायकलवरुन येऊन भाविक महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडुन थैमान घालणाऱ्यांची टोळी शिर्डी पोलीसांनी गजाआड केली..शिर्डी पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी १)किरण छगन सोनवणे रा.दत्तनगर कोपरगांव २)नवनाथ साहेबराव गौर्डे रा.पोहेगाव ३)मनोज चंद्रकांत बडोदेकर रा.बिरोबा रोड शिर्डी दरोड्याच्या उद्देशाने शिर्डीत येणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्या नंतर सापळा लावुन मोठ्या शिताफीने वरील आरोपींना अटक केली दरम्यान त्यांचे दोन साथीदार फरार असुन सदर आरोपी विरोधात गुन्हा दाखल करुन पोलीस कोठडीत घेऊन विचार पुस केली असता सदर आरोपींनी वेगवेगळ्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.आरोपीकडुन १० तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आरोपींना न्यायालयात हजर केले असता आरोपींना न्यायालयाने.१८मार्च २०१९ पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे....Body:17 March Shirdi Chain SnatchingConclusion:17 March Shirdi Chain Snatching
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.