ETV Bharat / state

भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 54 वा गळीत हंगाम शुभारंभ

केंद्राच्या शेतकरी कायद्यांचा काळे कायदे म्हणून यावेळी उल्लेख करण्यात आला. या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज दुपारी 4.00 वाजता महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे.

अहमदनगर
अहमदनगर
author img

By

Published : Oct 15, 2020, 3:48 PM IST

अहमदनगर - सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा 54 वा गळीत हंगाम शुभारंभ आज करण्यात आला. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, खासदार राजीव सातव यांच्यासह काँग्रेस नेते यावेळी उपस्थित होते.

केंद्राच्या शेतकरी कायद्यांचा काळे कायदे म्हणून यावेळी उल्लेख करण्यात आला. या कायद्यांविरोधात काँग्रेसने महाराष्ट्रात आंदोलन सुरू केले आहे. याचाच पुढचा टप्पा म्हणून आज दुपारी 4.00 वाजता महाराष्ट्रात शेतकरी बचाओ व्हर्च्युअल रॅली आयोजित केली आहे. या रॅलीचे 10 हजार गावात एकाचवेळी आयोजन केले जाणार आहे. सोशल मीडियावरही ही रॅली पाहता येईल अशी व्यवस्था करण्यात आली असून 50 लाख शेतकर्‍यांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न आहे.

संगमनेरमधील मुख्य कार्यक्रमासाठी काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील, अशोक चव्हाण, खासदार राजीव सातव, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे उपस्थित राहणार आहेत. शेतकरी बचाव रॅलीचा प्रमुख कार्यक्रम राज्यात पाच ठिकाणी असणार आहे.

हेही वाचा - जलयुक्त शिवार अहवालात 'कॅग'कडून फक्त सूचना, भ्रष्टाचाराचे आरोप नाहीत- राम शिंदे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.