ETV Bharat / state

मोहटादेवी सोने प्रकरणी जिल्हा न्यायालयात सहा आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मोहटादेवी जिर्णोद्धार करताना पुरलेल्या दोन किलो सोने प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोप पोलिसांनी दाखल केले आहे. अंधश्रद्धा आणि स्वार्थीहेतून सोने पुरलेल्या आरोपातून दाखल या प्रकरणात एकूण चोवीस जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

मंदिर
मंदिर
author img

By

Published : May 12, 2021, 8:50 PM IST

अहमदनगर - जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असलेल्या मोहटादेवी जिर्णोद्धार करताना पुरलेल्या दोन किलो सोने प्रकरणी दाखल गुन्ह्यातील सहा आरोपींविरोधात जिल्हा न्यायालयात दोषारोप पोलिसांनी दाखल केले आहे. अंधश्रद्धा आणि स्वार्थीहेतून सोने पुरलेल्या आरोपातून दाखल या प्रकरणात एकूण चोवीस जणांविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यात मोहटादेवी देवस्थानचे तत्कालीन अध्यक्ष असलेले न्यायाधीश नागेश नाव्हकर यांचाही समावेश आहे. तत्कालीन अध्यक्ष असलेल्या न्यायाधीशांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केलेला आहे. या प्रकरणी तपास करत असलेल्या अधिकाऱ्यांनी उर्वरित आरोपींच्या विरोधात पुरवणी दोषारोप पत्र सादर करणार आहेत.

काय आहे मोहटादेवी सोने प्रकरण

मोहटादेवी मंदिराचा जीर्णोद्धार करताना सुमारे दोन किलो सोन्याची सुवर्ण यंत्रे बनवून ती मूर्तीखाली पुरण्यात आली होती. त्यावरील पूजाअर्चेसाठी 25 लाख रुपये पंडिताला देण्यात आले होते. याप्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीने याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. तसेच देवस्थानचे माजी विश्वस्त नामदेव गरड यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. खंडपीठाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. तसेच मोहटादेवी मंदिरात सोनेपुर प्रकरणी नगर येथील धर्मादाय उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार करण्यात आलेली होती. त्याची चौकशी धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केली आहे. मात्र, चौकशीनंतर आजतागायत या कार्यालयाने काहीही कारवाई केली नाही. त्यामुळे या कार्यालयातील काही अधिकारी, कर्मचाऱ्यांचेही पोलीस जबाब घेणार असल्याची माहिती आहे.

यांच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी सुरुवातीला सहा आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे. त्यात सोलापूरचा पंडित प्रदीप मार्तंडराव जाधव, ज्याने पंचवीस लाख रुपये पूजाअर्चेसाठी दक्षिणा म्हणून फी घेतली होती. त्याचबरोबर देवस्थानचे तत्कालीन विश्वस्त संदीप रावसाहेब पालवे, रवींद्र बाजीराव शिंदे, पुरुषोत्तम शशिकांत रोडी, विक्रम रभाजी दहिफळे, श्रीकृष्ण लक्ष्मण गिरि यांच्याविरोधात तपासात समोर आलेल्या पुराव्याच्या अनुषंगाने दोषारोप पत्र दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा - जागतिक परिचारिका दिनीच आंदोलनाचा पवित्रा; १० कंत्राटी आरोग्य सेवक ताब्यात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.