विम्बल्डन- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार) होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींची पर्वणी आहे. मात्र, टेनिसशौकिनांसाठीही आजचा दिवस मोठ्या मेजवानीचा असणार आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे टेनिसशौकिनांना फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील द्वंद आज पाहता येणार आहे.
फेडररने आतापर्यंत विम्बल्डनची 8 विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत. त्याने १२ वेळा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा फेडरर हा तिसरा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
जोकोव्हिच आपल्या पाचव्या विम्बल्डन जेतेपदासाठी रविवारी सेंटर कोर्टवर उतरणार आहे. जोकोव्हिच आणि फेडरर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने 25 तर फेडररने 22 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण टेनिसप्रेमींचे या महाअंतिम फेरीकडे लक्ष लागले आहे.
३७ वर्षीय फेडररने शुक्रवारी रात्री स्पेनच्या राफेल नदालला पराभूत केले. फेडररने ७-६ (७/३), १-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत ३१ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत जोकोव्हिच अव्वल स्थानी आहे. उपांत्य फेरीत त्याने स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा याचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले.
फेडरर-जोकोव्हिच विम्बल्डनच्या अंतिम सामन्यात भिडणार
आज रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे टेनिसशौकियांसाठी आज मोठी मेजवानी असणार आहे.
विम्बल्डन- इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात आज (रविवार) होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेतील अंतिम सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींची पर्वणी आहे. मात्र, टेनिसशौकिनांसाठीही आजचा दिवस मोठ्या मेजवानीचा असणार आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे टेनिसशौकिनांना फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील द्वंद आज पाहता येणार आहे.
फेडररने आतापर्यंत विम्बल्डनची 8 विजेतेपदे आपल्या नावावर केली आहेत. त्याने १२ वेळा विम्बल्डनच्या अंतिम फेरीत मजल मारली आहे. ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम फेरीत खेळणारा फेडरर हा तिसरा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे.
जोकोव्हिच आपल्या पाचव्या विम्बल्डन जेतेपदासाठी रविवारी सेंटर कोर्टवर उतरणार आहे. जोकोव्हिच आणि फेडरर यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात जोकोव्हिचने 25 तर फेडररने 22 वेळा विजय मिळवला आहे. त्यामुळे संपूर्ण टेनिसप्रेमींचे या महाअंतिम फेरीकडे लक्ष लागले आहे.
३७ वर्षीय फेडररने शुक्रवारी रात्री स्पेनच्या राफेल नदालला पराभूत केले. फेडररने ७-६ (७/३), १-६, ६-३, ६-४ असा विजय मिळवत ३१ वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
जागतिक क्रमवारीत जोकोव्हिच अव्वल स्थानी आहे. उपांत्य फेरीत त्याने स्पेनच्या रॉबटरे बॉटिस्टा याचा ६-२, ४-६, ६-३, ६-२ असा पराभव केला आणि अंतिम फेरीत स्थान मिळवले.
विम्बल्डनमध्ये रंगणार फेडरर आणि जोकोव्हिच अंतिम सामना
विम्बल्डन- रविवारी इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यामुळे क्रिकेटप्रेमींना पर्वणी मिळणार आहे. मात्र, टेनिसशौकियांसाठीही आजचा दिवस मोठ्या मेजवानीचा असणार आहे. स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर आणि सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच यांच्यात विम्बल्डन खुल्या टेनिस स्पर्धेचा अंतिम सामना होणार आहे. त्यामुळे टेनिसशौकियांना फेडरर आणि जोकोव्हिच यांच्यातील द्वंद आज पाहता येणार आहे.

Conclusion: