मेलबर्न - ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत मंगळवारी रशियाच्या अस्लन कारात्सेवने ऐतिहासिक कामगिरी केली. त्याने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात ग्रिगोर दिमित्रोव याचा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे.
अस्लन कारात्सेव हा जागतिक क्रमवारीत ११४ व्या क्रमाकांवर आहे. त्याने १८ व्या मानांकित बुलगेरियाच्या ग्रिगोरचा पराभव केला आणि उपांत्य फेरी गाठली.
उपांत्यपूर्व सामन्यात कारात्सेवने पहिला सेट २-६ अशा फरकाने गमावला. यानंतर त्याने दुसऱ्या सेटमध्ये दमदार वापसी करत हा सेट ६-४ ने जिंकला आणि सामना बरोबरीत आणला. त्याने आपला हा धडाका पुढील दोन्ही सेटमध्ये कायम राखत पुढील दोन्ही सेट ६-१, ६-२ ने एकतर्फा जिंकले.
सर्वात कमी क्रमवारी असलेल्या खेळाडूने प्रथमच ग्रँडस्लॅमच्या इतिहासात उपांत्य फेरी गाठली आहे. उपांत्य फेरीत त्याचा सामना नोवाव जोकोव्हिच याच्याशी होणार आहे.
कारात्सेवने २०२१ मध्ये ग्रँडस्लॅममध्ये डेब्यू केला आहे. यात पहिल्याच ग्रँडस्लॅममध्ये उपांत्य फेरी गाठणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
हे खरचं अविश्वसनीय भाव आहेत. मी पहिल्यादाच मुख्य ड्रा खेळला. यात उपांत्य फेरी गाठली. हे खूप शानदार आहे. उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात संयम राखणे माझ्यासाठी अत्यंत कठीण होते. पहिला सेट गमावल्यानंतर मी प्रयत्न करत सामन्यात वापसी केली, अशी प्रतिक्रिया सामना संपल्यानंतर कारात्सेवने दिली.
हेही वाचा - Australian Open : हालेपचा धुव्वा उडवत सेरेना उपांत्य फेरीत
हेही वाचा - टेनिसच्या मैदानात जोकोविचचे त्रिशतक!