ETV Bharat / sports

एमएमए : रितू फोगाटची सलग तिसऱ्या सामन्यात बाजी

author img

By

Published : Oct 31, 2020, 4:41 PM IST

सिंगापूर इनडोर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रेफरीने तिसऱ्या फेरीत दोन मिनिटे ३० सेकंदानंतर सामना थांबविला. यासह, रितूने एमएमएमध्ये ३-० अशी कामगिरी केली आहे. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतरही रितू तिच्या लयीत दिसली.

Ritu phogat won her third consecutive mma match
एमएमए : रितू फोगाटची सलग तिसऱ्या सामन्यात बाजी

नवी दिल्ली - कुस्तीपटू रितू फोगाटने मिक्स मार्शल आर्ट्समध्ये सलग तिसरा सामना जिंकला आहे. शुक्रवारी वन चॅम्पियनशिपमध्ये खेळल्या गेलेल्या नॉकआऊट सामन्यात रितूने कंबोडियाच्या नाऊ सरे पोव्हचा पराभव केला.

सिंगापूर इनडोर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात रेफरीने तिसऱ्या फेरीत दोन मिनिटे ३० सेकंदानंतर सामना थांबविला. यासह, रितूने एमएमएमध्ये ३-० अशी कामगिरी केली आहे. आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतरही रितू तिच्या लयीत दिसली.

सामन्यानंतर रितू म्हणाली, "एमएमएमधील या विजयामुळे मला खूप आनंद होत आहे. साथीच्या काळात मी केलेले कठोर परिश्रम कामी आले. एमएमएमध्ये भारताला नव्या उंचीवर नेल्यामुळे मला आनंद होत आहे. आता मी विश्वविजेतेपद जिंकण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे."

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.