मुंबई - टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा नेहमी सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतो. यादरम्यान, त्याने डान्स+6 या रिअॅलटी शोमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमात होस्ट राघव जुयालसह इतर कंटेस्टेंट्सने नीरज चोप्राला मजेशीर प्रश्न विचारले. इतकेच नव्हे तर त्यांनी नीरजला डान्स करण्यास भाग पाडले.
नीरज चोप्राविषयी मुलींसह अनेक जण विविध बाबी सर्च करत आहे. याविषयी राघव जुयाल याने प्रश्न विचारले. यात नीरजचे लग्न आणि गर्लफ्रेंडविषयी देखील त्याने प्रश्न केला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पुनित पाठक याने सर्व मुलींच्या वतीने नीरज चोप्राला विचारले की, त्याला कोणत्या प्रकारची मुलगी पसंद आहे. यावर राघव जुयाल तात्काळ म्हणाला की, भाल्यासारखी. यावर नीरज चोप्रा म्हणाला की, नाही नाही ती तर मग खूप उंच होईल. इतक्या उंचीचा काय करू.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
नीरज पुढे म्हणाला की, मी खेळाडू आहे ती पण खेळाडू असेल तर उत्तम आहे. याशिवाय एकदुसऱ्याची रिस्पेक्ट असली पाहिजे. ही बाब खूप महत्वाची आहे. सोबत फॅमिलीची देखील रिस्पेक्ट असायला हवी. माझ्यासाठी ही बाब खूप गरजेची आहे. मला वाटत की, अशीच मुलगी बेस्ट असेल.
काही लोक सोशल मीडियावर नीरज चोप्राचा नंबर सर्च करत आहेत. याविषयी देखील नीरज चोप्राला प्रश्न विचारण्यात आला. यावर नीरज म्हणाला की, जेव्हा मी खेळाला सुरूवात केली होती. तेव्हा मी माझ्या काकांनी मला त्यांचा नंबर दिला होता. तोच नंबर मी आजपर्यंत वापरत आहे. मला मॅसेज केलेल्या सर्वांना रिप्लाय देण्याचा माझा प्रयत्न असतो. पण आता हे शक्य होत नाहीये. यामुळे मी तो नंबर ऑलिम्पिकच्या एक वर्ष आधी बंद केले होते. आतापर्यंत मी तो चालू केलेला नाही. कारण मी तो चालू केला तर मी सर्वांना रिप्लाय देऊ शकणार नाही. यामुळे मी तो बंदच ठेवला आहे.
दरम्यान, नीरज चोप्राने डान्स+6 च्या शो मध्ये धम्माल मस्ती केली. हा एपिसोड लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
हेही वाचा - RCB vs RR: आरसीबीचा विजयी लय राखण्याचा निर्धार; राजस्थानसाठी 'करो या मरो'ची लढत
हेही वाचा - AUSW vs INDW: मला गुलाबी चेंडूवर खेळण्याचा अनुभव नाही; डे नाइट कसोटीआधी अस का म्हणाली मिताली राज