नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने ( एआयबीए ), भारतामध्ये २०२१ मध्ये होणाऱ्या विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी आकारलेले शुल्क न भरल्यामुळे यजमानपद काढून घेतले आहे. तसेच एआयबीएने भारतीय बॉक्सिंग महासंघाला ( बीएफआय ) दंड म्हणून ५०० अमेरिकन डॉलर भरण्यासही सांगितले आहे. यावर भारतीय महासंघाने, एआयबीएकडून घाईघाईत हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगितले.
एआयबीएच्या निर्णयावर बीएफआयने सांगितलं की, 'लुसाने येथील एआयबीएचे खाते बंद असल्याने सर्बियामध्ये असलेल्या एका खात्याद्वारे त्यांच्याशी आर्थिक व्यवहार करावा लागणार होता. पण, सर्बिया फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या काळ्या यादीमध्ये येते. यामुळे भारतीय बँक तिथे पैसे पाठवत नाही. ही समस्या उद्भवली. त्यांनी आमच्याशी चर्चा न करताच घाईघाईमध्ये यजमानपद काढून घेण्याचा निर्णय घेतला.
एआयबीएने आम्हाला दंड लावला याचेही आम्हाला आश्चर्य वाटते. या समस्येचा आम्ही मिळून तोडगा काढू. आम्हाला आशा आहे की, भविष्यात या स्पर्धेचे आम्ही यजमानपद सांभाळू, असेही बीएफआय स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एआयबीएने भारताकडून यजमानपद काढून घेत हे यजमानपद सर्बियाला दिले आहे. भारताने पहिल्यांदाच या स्पर्धेच्या यजमानपदासाठी २०१७ मध्ये आपला अर्ज दाखल केला होता. पण भारतीय बॉक्सिंग महासंघ शुल्क भरण्यास अपयशी ठरली. यामुळे भारताने स्पर्धेचे यजमानपद गमावले.
हेही वाचा - ऑलिम्पिकसाठी कोरोना लसीची गरज नाही - ऑलिम्पिक अधिकारी
हेही वाचा - भारताने आकारलेले शुल्क न भरल्याने, यजमानपद गमावले; झाला 'इतका' दंड