ETV Bharat / sports

ला-लीगाच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांची घोषणा

author img

By

Published : Jun 1, 2020, 5:19 PM IST

11 जूनला सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेविला आणि रिअल बेटिस आमनेसामने असतील. एका वृत्तानुसार, सर्व लीग सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील. रिअलचा संघ उर्वरित सहा सामने घरच्या मैदानावर खेळणार आहेत.

La Liga announces fixtures for new season
ला-लीगाच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांची घोषणा

बार्सिलोना - स्पॅनिश लीग ला लीगाच्या पहिल्या दोन फेऱ्यांच्या सामन्यांची घोषणा झाली आहे. 11 जूनला सुरू होणाऱ्या या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात सेविला आणि रिअल बेटिस आमनेसामने असतील. तर, 13 जूनला बार्सिलोनाचा संघ रियल मॅलोर्काविरुद्ध उभा ठाकेल. कोरोनामुळे ही लीग मार्चमध्ये तहकूब करण्यात आली होती.

त्यानंतर 16 जूनला बार्सिलोना लेगनेसचे आयोजन करेल. तर 18 जूनला रिअल माद्रिद आणि वॉलेन्शिया संघात सामना होईल. बार्सिलोनाचा संघ सध्या 58 गुणांसह टेबलमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. रिअल मेडिडचा संघ 56 गुणांसह दुसर्‍या तर, सेविला 47 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.

एका वृत्तानुसार, सर्व लीग सामने प्रेक्षकांशिवाय रिकाम्या स्टेडियममध्ये खेळले जातील. रिअलचा संघ उर्वरित सहा सामने घरच्या मैदानावर खेळणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.