ETV Bharat / sports

IPL 2023: विराटने पाया पडणाऱ्या तरुणाला मारली मिठी तर गौतम गंभीरला भिडला; सामनाधिकाऱ्यांनी ठोठावला मोठा दंड

author img

By

Published : May 2, 2023, 8:48 AM IST

Updated : May 2, 2023, 10:25 AM IST

अटलबिहारी वाजपेयी एकना मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जायंट या दोन संघात रंगतदार सामना झाला. यावेळी बंगळुरूने लखनौवर विजय मिळवला. मात्र विराट कोहली आणि गौतम गंभीरच्या वादाने या सामन्याला गालबोट लागले.

Virat Confronts Gautam Gambhir
विराट कोहली आणि गौतम गंभीर मैदानात भिडले

लखनौ : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली हा लखनौ सुपर जायंटचा मार्गदर्शक गौतम गंभीरवर मैदानातच चालून गेला. यावेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत विराट कोहलीला बाजुला केले. विराट कोहलीच्या या कृत्यामुळे त्याला 100 टक्के फी कपातीचा दंड ठोठावण्यात आला. दुसरीकडे याच सामन्यात क्षेत्ररक्षणादरम्यान एक तरुण मैदानात घुसून विराटच्या पायाला स्पर्श करू लागला. त्यानंतर कोहलीने त्याला मिठी मारली. त्यामुळे अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानात विराट कोहलीची एकाचवेळी वेगवेगळी रुपे पाहायला मिळाली.

विराट कोहली आणि गौतम गंभीरचा जुना वाद : विशेष म्हणजे या दोन्ही खेळाडूंमधील वादाच्या कहाण्या जुन्या आहेत. याआधी गौतम गंभीरने आयपीएल सामन्यात विराट कोहलीच्या वादाचा सामना केला आहे. तर, बंगळुरूमध्ये झालेल्या सामन्यात लखनौने विजय मिळवला, तेव्हाही कोहलीची कृती आक्रमक मानली जात होती. लखनौच्या सामन्यात विराट कोहली चांगलाच आक्रमक झाला. यावेळी इतर खेळाडूंनी मध्यस्थी करत विराटला मैदानात नेले.

बंगळुरूने घेतला बदला : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जॉयंट या दोन संघातील सामना लखनौतील अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानात पार पडला. या सामन्यात विराट कोहलीने 3 झेल घेत 31 धावा केल्या. हा सामना जिंकून बंगळुरूने लखनौकडून पहिल्या पराभवाचा बदला घेतला. सामना संपल्यानंतर तो पॅव्हेलियनकडे जात असताना लखनऊचा मेंटर गौतम गंभीरसोबत त्याची बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही संघातील खेळाडूंनी त्यांना वेगळे केले.

मैदानात घुसला तरुण : अटल बिहारी वाजपेयी एकना मैदानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि लखनौ सुपर जॉयंट या दोन संघात सोमवारी सामना खेळवण्यात आला. या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीरची बाचाबाची झाल्याने चांगलाच वाद निर्माण झाला. तर दुसरीकडे हा सामना सुरू असताना सुरक्षाकडे तोडून एक तरुण थेट मैदानात घुसला. या तरुणाने विराट कोहलीच्या पायाला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी विराटने त्या तरुणाला मिठी मारली. त्याुळे मैदानात एकच जल्लोष सुरू झाला.

मॅच फीच्या 100 टक्के दंड- लखनौ सुपर जायंट्सचा मार्गदर्शक गौतम गंभीर आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विराट कोहली यांच्यात राडा झाल्याचा प्रकार आयपीएल व्यवस्थापनाने गांभीर्याने घेतला आहे. आयपीएल आचारसंहितेचा भंग केल्याबद्दल त्यांच्या मॅच फीच्या 100 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. दोघांनी आयपीएल आचारसंहितेच्या कलम 2.21 अंतर्गत लेव्हल 2 गुन्ह्याची कबुली दिली आहे.

हेही वाचा - IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौवर १८ धावांनी विजय मिळवला

Last Updated : May 2, 2023, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.