ETV Bharat / sports

IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग', पाहा जबराट व्हिडिओ

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग' बनला आहे.

IPL 2021 :  mohammed siraj becomes the new yorker king harassing batsmen in this way watch video
IPL २०२१ : मोहम्मद सिराज नवा यॉर्कर किंग, पाहा जबराट व्हिडिओ
author img

By

Published : Apr 28, 2021, 7:02 PM IST

मुंबई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा प्रमुख वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज नवा यॉर्कर 'किंग' बनला आहे. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात सिराजने आपल्या यॉर्कर गोलंदाजीच्या जोरावर बंगळुरू संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीचा स्फोटक फलंदाज ऋषभ पंत आणि शिमरोन हेटमायर सिराजच्या यॉर्करला पर्याय शोधून शकले नाहीत. परिणामी दिल्लीचा एका धावेने पराभव झाला.

दिल्लीला अखेरच्या षटकात विजयासाठी १४ धावांची गरज होती. पण सिराजने यॉर्कर मारा करत दिल्लीच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून लांब ठेवले. सिराज आयपीएलमध्ये गोलंदाजीदरम्यान, जास्ती जास्त यॉर्कर चेंडूचा वापर करत आहे. यामुळे फलंदाजांना त्याच्या गोलंदाजीवर धावा करणे अवघड बनलं आहे.

सिराजने आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला सुरूवात होण्याआधीच स्पष्ट केलं होतं की, तो या आयपीएलमध्ये यॉर्करचा मारा जास्त करणार आहे. यासाठी त्याने खास तयारी देखील केल्याचे सांगितले. सिराजने आतापर्यंत ६ सामन्यात ६ गडी बाद केले आहेत. या हंगामात त्याने १३८ चेंडू फेकले आहेत. सिराज या आयपीएलमध्ये ५० चेंडू निर्धाव फेकणारा पहिला गोलंदाज आहे.

आयपीएल २०२१ मध्ये सिराज वेगळ्याच अंदाजात पाहायला मिळत आहे. त्याने चेन्नईविरुद्धच्या सामन्यात या हंगामातील सर्वात वेगवान चेंडू फेकला. त्याने १४७.६७ किमी वेगाने चेंडू ऋतुराज गायकवाडला फेकला होता.

हेही वाचा - IPL २०२१ Points Table : बंगळुरूने चेन्नईला दिला मोठा धक्का, पटकावले मानाचे स्थान

हेही वाचा - IPL २०२१ : मुंबई नाही तर 'हा' संघ जिंकणार स्पर्धा, रवी शास्त्रींचा सूचक इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.