ETV Bharat / sports

श्रेय्यस अय्यर उर्वरित IPL २०२१ हंगामामध्ये खेळणार, ऋषभ पंतचे कर्णधारपद जाणार?

दिल्लीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.

http://10.10.50.85:6060///finalout4/maharashtra-nle/finalout/05-July-2021/12362683_s.jpg

author img

By

Published : Jul 5, 2021, 5:20 PM IST

मुंबई - दिल्ली कॅपिटल्स संघाच्या चाहत्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दिल्लीचा स्टार खेळाडू श्रेयस अय्यर आयपीएल २०२१ चा उर्वरित हंगाम खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. परंतु, श्रेयसच्या अनुपस्थितीत यंदा ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधारपद भूषवले होते. त्यामुळे श्रेयसचे पुनरागमन झाल्यावर कोण दिल्लीचे नेतृत्व करणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र, कर्णधारपदाचा निर्णय माझ्या हातात नसल्याचे श्रेयसने सांगितलं.

आयपीएल स्पर्धेआधी झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. यामुळे श्रेयस अय्यरला आयपीएल २०२१ हंगामाला मुकावे लागले होते. हा हंगाम देशातील वाढलेला कोरोनाचा प्रादुर्भाव आणि खेळाडूंना झालेली कोरोनाची लागण यामुळे स्थगित करण्यात आला होता. आता उर्वरित हंगाम सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये युएईत होणार आहे. या उर्वरित हंगामात खेळण्यासाठी श्रेयस सज्ज झाला आहे.

श्रेयस म्हणाला, खांद्याला झालेल्या दुखापतीतून मी सावरलो आहे. आता अखेरचा टप्पा बाकी असून त्याला महिन्याभराचा कालावधी लागेल. परंतु, मी सरावाला सुरुवात केली आहे. मी आयपीएल २०२१ च्या उर्वरित हंगामात खेळणार आहे.

कर्णधारपदाबाबत श्रेयशला विचारले असता तो म्हणाला, कर्णधारपदाची मला खात्री नाही. हा निर्णय संघमालकांच्या हातात आहे. माझ्या अनुपस्थितीत देखील दिल्लीचा संघ गुणतक्त्यात अव्वलस्थानी होता. मी केवळ याच गोष्टीला महत्त्व देतो. दिल्लीला आयपीएलचे जेतेपद पटकावण्यास मदत करणे हे माझे लक्ष्य आहे.

दरम्यान, श्रेयसच्या नेतृत्वात दिल्ली संघाने आयपीएल २०२० मध्ये अंतिम फेरी गाठली होती. पण ते विजेतेपद पटकावण्यात अपयशी ठरले. अंतिम सामन्यात त्यांना मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्कारावा लागला. यंदा आयपीएल २०२१ हंगामात श्रेयसच्या अनुपस्थितीतही दिल्लीने चांगला खेळ केला. यंदा पंतच्या नेतृत्वात खेळताना दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले आहेत.

हेही वाचा - IPL मध्ये २ नवीन संघ येणार; मेगा ऑक्शन 'या' महिन्यात होणार

हेही वाचा - IPL २०२२ Mega Auction : CSK 'या' ४ खेळाडूंना करू शकते रिटेन; सुरेश रैनाचा होणार पत्ता कट?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.