ETV Bharat / sports

सचिनच्या संघात धोनीला 'डच्चू', कर्णधारपदी केनला दिली पसंती

सचिनने आपल्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे सोपवले. मात्र, सचिनने पाच भारतीय खेळाडूंचा समावेश संघात केला आहे.

सचिनच्या संघात धोनीला 'डच्चू', कर्णधारपदी केनला दिली पसंती तर..
author img

By

Published : Jul 16, 2019, 7:59 PM IST

Updated : Jul 16, 2019, 11:28 PM IST

नवी दिल्ली - भारताचा महान खेळाडू सचिन तेंडूलकरने विश्वकरंडक स्पर्धा संपल्यानंतर आपली 'फेव्हरेट' ड्रीम 11 संघाची निवड केली. विश्वकरंडक स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमधून त्याने आपला संघ निवडला. महत्वाचे म्हणजे, सचिनने आपल्या संघात महेंद्रसिंह धोनीला स्थान दिलेले नाही. तसेच त्याने आपल्या संघाच्या कर्णधारपदी केनला पसंती दिली. मात्र, त्याने पाच भारतीय खेळाडूंचा समावेश संघात केला आहे.

सचिनने आपल्या संघाचे कर्णधारपद न्यूझीलंडच्या केन विल्यमसनकडे सोपवले. सचिनच्या निवडीनुसार रोहित शर्मा आणि इंग्लंडचा जॉनी बेअरस्टो सलामीवीर असतील. त्यानंतर कर्णधार केन विल्यमसन फलंदाजी करेल. चौथ्या क्रमांकावर भारतीय कर्णधार विराट कोहली फलंदाजीला उतरेल. त्यानंतर बांग्लादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, इंग्लंडचा बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाचा नंबर लागला आहे.

गोलंदाजीमध्ये सचिनने इंग्लंडचा जोप्रा आर्चर, मिचेल स्टार्क आणि जसप्रीत बुमराहला निवडले आहे.

सचिनचा ड्रीम 11 संघ -
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), केन विल्यमसन (कर्णधार), विराट कोहली, शाकिब अल हसन, बेन स्टोक्स, हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, जोफ्रा आर्चर, मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 16, 2019, 11:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.