हैदराबाद - आयपीएल सुरू होण्यापूर्वी काही दिवसांचा अवधी उरला आहे. तत्पूर्वीच हैदराबाद सनरायझर्सच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनला बांगलादेशविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटीच्या दरम्यान खांद्याला दुखापत झाली आहे. तो आयपीएलमधील सुरुवातीचे काही सामने खेळण्याची शक्यता कमी आहे.
विलियमसन हा हैदराबाद सनरायजर्स संघाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. मागील वर्षी संघाने त्याच्याच नेतृत्वाखाली अंतिम सामन्यात मझल मारली. डेव्हिड वॉर्नरच्या अनुपस्थितीत विलियमसनची बॅट चांगली तळपली होती.
विलियमसनला दुसऱ्या कसोटीच्यावेळी सामन्याच्यामध्येच स्कॅन करण्यासाठी त्याला रुगणालयात जावे लागले. या दुखापतीमुळे तो तिसऱ्या कसोटीला मुकण्याची शक्यता व्यक्त केली जातोय.
याबाबत न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी माहिती देताना म्हणाले की, मला आशा आहे की विलियमसन पूर्णपणे तंदुरुस्त होईल. त्याचा फिटनेस पाहूनच आम्ही त्याला भारतात पाठवू. आयपीएलपेक्षा आम्हाला विश्वचषक महत्त्वाचा आहे.