मुंबई - इंडियन प्रीमियर लीगच्या १३ व्या हंगामाला २९ मार्चपासून सुरुवात होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. मुंबई इंडियन्सने १३ व्या पर्वाला सुरूवात होण्याआधीच एक नवा विक्रम आपल्या नावे केला. मुंबई इंडियन्स सातव्यांदा आयपीएलचा उद्घाटन सामना खेळणार असून आयपीएलच्या तेरा वर्षांच्या इतिहासातला हा एक विक्रम आहे.
आयपीएलचे हे यंदाचे १३ वे पर्व आहे. यात रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स सातव्यांदा आयपीएलचा उद्धाटन सामना खेळेल. आत्तापर्यंत कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्सने सर्वाधिक उद्घाटन सामने खेळण्याच्या यादीत ६-६ सामने खेळून प्रथम क्रमांकावर होते. मात्र नव्या वेळापत्रकानुसार मुंबई इंडियन्सने कोलकाताला मागे टाकले आहे. या यादीत चेन्नई सुपर किंग्जने ५ सामन्यासह दुसऱ्या क्रमाकांवर आहे. यंदाचा चेन्नईचा ६ उद्धाटन सामना असेल.
IPL चे सर्वाधिक उद्घाटन सामने खेळणारे संघ -
- ७ वेळा - मुंबई इंडियन्स*
- ६ वेळा - चेन्नई सुपर किंग्स*
- ६ वेळा - कोलकाता नाइट राइडर्स
- ३ वेळा - रॉयल चैलेंजर्स बैंगलोर
- १ वेळा - डेक्कन चार्जेस
- १ वेळा - दिल्ली डेयरडेविल्स
- १ वेळा - राइजिंग पुणे सुपरजायंट
- १ वेळा - सनराइजर्स हैदराबाद
आयपीएलचे १३ हंगामातील उद्घाटन सामने -
- २००८ - RCB vs KKR
- २००९ - CSK vs MI
- २०१० - KKR vs DC
- २०११ - CSK vs KKR
- २०१२ - CSK vs MI
- २०१३ - DD vs KKR
- २०१४ - KKR vs MI
- २०१५ - MI vs KKR
- २०१६ - MI vs RPS
- २०१७ - SRH vs RCB
- २०१८ - CSK vs MI
- २०१९ - CSK vs RCB
- २०२० - MI vs CSK* (होणारा सामना)
हेही वाचा -
IPL २०२० : प्रतीक्षा संपली, जाणून घ्या एका क्लिकवर आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक...
हेही वाचा -
IPL २०२० : धोनी इज बॅक, आठ महिन्यांच्या विश्रांतीनंतर खेळणार पहिला सामना