ETV Bharat / sports

''हॅलो आंटी'', भुवनेश्वर कुमारचा महिला चाहतीसोबतचा संवाद व्हायरल!

author img

By

Published : Jul 13, 2020, 3:19 PM IST

भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही आपल्या घरीच व्यायामशाळा तयार केली आहे. यासंदर्भात एका क्रिकेट चाहतीने भुवनेश्वरला फिटनेस संदर्भात प्रश्न विचारले. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिले.

indian pacer bhuvneshwar kumars reply to female fan goes viral
''हॅलो आंटी'', भुवनेश्वर कुमारचा महिला चाहतीसोबतचा संवाद व्हायरल!

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक खेळाडू आपल्या घरीच आहेत. तब्बल तीन महिने सुरू असलेल्या या लॉकडाउनमुळे क्रिकेटवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे क्रिकेटपटूही व्यवस्थित प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण घरीच व्यायामाला पसंती देत आहेत.

भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही आपल्या घरीच व्यायामशाळा तयार केली आहे. यासंदर्भात एका क्रिकेट चाहतीने भुवनेश्वरला फिटनेस संदर्भात प्रश्न विचारले. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिले.

नारायणी नावाच्या एका महिलेने #AskBhuvi या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला. ''सध्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतोस? तुझा आवडीचा व्यायाम कोणता?'', असे या महिलेने विचारले. यावर भुवीने लिहिले की, ''हॅलो आंटी. मी माझ्या बाल्कनीमध्ये जिम तयार केली आहे. घरापाठीमागील लॉनचा वापर धावण्यासाठी करत आहे. आणि पॉवरलिफ्टिंग माझा आवडता व्यायाम आहे.''

  • Hello aunty , converted our balcony to gym & using backside lawns for running. I love doing power lifting. https://t.co/h80XUvQqGf

    — Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) July 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Hello aunty , converted our balcony to gym & using backside lawns for running. I love doing power lifting. https://t.co/h80XUvQqGf

— Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) July 12, 2020

यावर नारायणी म्हणाल्या, ''खूपच चांगली योजना आहे बाल्कनीचा योग्य उपयोग. नुपूर वहिनीला प्रेम.'' भुवी आणि या महिलेचा संवाद सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड होत आहे.

काही दिवसांपूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन महिन्यांनंतर मैदानी प्रशिक्षण सुरू केले होते. तर, गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही आऊटडोर ट्रेनिंग सुरू केले होते. लॉकडाउनमध्ये आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

मुंबई - कोरोना व्हायरसमुळे भारतात लॉकडाउन लागू करण्यात आला आहे. या लॉकडाउनमुळे अनेक खेळाडू आपल्या घरीच आहेत. तब्बल तीन महिने सुरू असलेल्या या लॉकडाउनमुळे क्रिकेटवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे क्रिकेटपटूही व्यवस्थित प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. अशा परिस्थितीत अनेकजण घरीच व्यायामाला पसंती देत आहेत.

भारताचा स्टार गोलंदाज भुवनेश्वर कुमारनेही आपल्या घरीच व्यायामशाळा तयार केली आहे. यासंदर्भात एका क्रिकेट चाहतीने भुवनेश्वरला फिटनेस संदर्भात प्रश्न विचारले. तेव्हा त्याने आपल्या शैलीत उत्तर दिले.

नारायणी नावाच्या एका महिलेने #AskBhuvi या प्रश्नोत्तराच्या माध्यमातून एक प्रश्न विचारला. ''सध्या स्वतःला फिट ठेवण्यासाठी काय करतोस? तुझा आवडीचा व्यायाम कोणता?'', असे या महिलेने विचारले. यावर भुवीने लिहिले की, ''हॅलो आंटी. मी माझ्या बाल्कनीमध्ये जिम तयार केली आहे. घरापाठीमागील लॉनचा वापर धावण्यासाठी करत आहे. आणि पॉवरलिफ्टिंग माझा आवडता व्यायाम आहे.''

  • Hello aunty , converted our balcony to gym & using backside lawns for running. I love doing power lifting. https://t.co/h80XUvQqGf

    — Bhuvneshwar Kumar (@BhuviOfficial) July 12, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यावर नारायणी म्हणाल्या, ''खूपच चांगली योजना आहे बाल्कनीचा योग्य उपयोग. नुपूर वहिनीला प्रेम.'' भुवी आणि या महिलेचा संवाद सोशल मीडियावर जबरदस्त ट्रेंड होत आहे.

काही दिवसांपूर्वी, भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने तीन महिन्यांनंतर मैदानी प्रशिक्षण सुरू केले होते. तर, गोलंदाज शार्दुल ठाकूरनेही आऊटडोर ट्रेनिंग सुरू केले होते. लॉकडाउनमध्ये आऊटडोअर ट्रेनिंग करणारा शार्दुल भारताचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.