ETV Bharat / sports

दिल्लीचा पंजाबवर ५ गडी राखून विजय, प्लेऑफसाठीची चुरस वाढली

सध्या आयपीएलमध्ये सर्वच संघांमध्ये प्लेऑफकरता चढाओढ पाहायला मिळत आहे, म्हणूनच आजच्या सामन्यात दोन्ही संघामध्ये पहिल्या चार मध्ये राहण्यासाठी चुरस दिसली.

विजय साजरा करताना दिल्लीचे खेळाडू
author img

By

Published : Apr 21, 2019, 2:51 AM IST

दिल्ली - आयपीएलमध्ये आज झालेल्या सामन्यात दिल्लीने पंजाबर पाच विकेट्सने विजय मिळवला. सध्या आयपीएलमध्ये सर्वच संघांमध्ये प्लेऑफकरीता चढाओढ पाहायला मिळत आहे. म्हणूनच, आजच्या सामन्यात दोन्ही संघामध्ये पहिल्या चारमध्ये राहण्यासाठी चुरस दिसली.

दिल्लीच्या फिरोशहा कोटला मैदानावर झालेल्या या सामन्यात दिल्लीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या कर्णधाराचा हा निर्णय योग्य ठरवत गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. त्यांनी पंजाबच्या तगड्या फलंदाजांना १६४ धावांवर रोखलं. तर मिळालेल्या आव्हानाच पाठलाग करताना दिल्लीकडून शिखर धवन आणि श्रेयस अय्यर यांनी सुरेख फलंदाजी केली. श्रेयसने ४९ चेंडूत ५८ धावा केल्या . तर सलामीला आलेल्या शिखर धवनने आक्रमक फटकेबाजी करताना झटपट ५६ धावा केल्या. शिखर आणि श्रेयसच्या अर्धशतकी भागीदारीनं दिल्लीला विजयाच्या जवळ नेले.

तत्पुर्वी, प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या पंजाबने लोकेश राहुल आणि मयंक अग्रवाल हे झटपट दोन बळी गमावले. मात्र, ख्रिस गेलने एकाकी झुंज देत आपली तुफानी फलंदाजी सुरुच ठेवली. त्याने केवळ २५ चेंडूत आपले अर्धशतक पुर्ण केले. गेल ३७ चेंडूत झटपट ६९ धावा काढून बाद झाला. नंतर फलंदाजीस आलेल्या हरप्रीत सिंह आणि कर्णधार आर. अश्विन यांनी शेवटच्या दोन षटकांमध्ये तब्बल २९ धावा वसूल केल्या. दिल्लीकडून संदीप लामिछाने ४० धावा देत ३ बळी घेतले. तर, दिल्लीचा स्टार गोलंदाज रबाडाने २ बळी घेतले. सध्या गुणतालिकेत दिल्लीचा संघ तिसऱ्या तर पंजाबचा संघ चौथ्या स्थानावर आहे.

Intro:Body:Conclusion:

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.