ETV Bharat / sports

डेल स्टेन म्हणतो कॅगिसो रबाडा हा एक 'अद्भुत' गोलंदाज

author img

By

Published : Apr 18, 2019, 7:51 PM IST

रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे

कॅगिसो रबाडा

नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिका आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळणारा दिग्गज वेगवान गोलंदाज डेल स्टेनने आपला संघसहकारी कॅगिसो रबाडाला एक अद्भुत गोलंदाज असल्याचे म्हटले आहे. राबाडाने स्व:ताला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सिद्ध केले असल्याचेही तो म्हणाला.

सध्या २३ वर्षीय रबाडाला भारताच्या जसप्रीत बुमराहसोबत जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणले जात आहे. आयपीएलमध्ये कॅगिसो रबाडाने दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळत असून बाराव्या मोसमात त्याने आतापर्यंत सर्वाधिक १७ विकेट आपल्या नावावर केले आहेत.

डेल स्टेन
डेल स्टेन

इडन गार्डन्स स्टेडियमवर सराव सत्रादरम्यात स्टेन म्हणाला की, तुम्ही रबाडाला पहा, तो चांगली गोलंदाजी करत असून तो एक अद्भुत गोलंदाज आहे. मी आशा करतो की, तो आपल्या शानदार फॉर्मला तसाच कायम ठेवेल. रबाडाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोने केले आहे. आपण आजवर पाहिले आहे की, अनेक युवा खेळाडू येतात, आपले कौशल्य दाखवतात आणि काही काळाने गायब होऊन जातात. मात्र रबाडा त्याला अपवाद असल्याचे स्टेन म्हणाला.

रबाडाने आतापर्यंत ३७ कसोटी सामन्यात १७६ तर ६६ एकदिवसीय सामन्यांमध्ये १०६ विकेट घेतल्या आहेत. आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत तो वनडेत पाचव्या तर टेस्टमध्ये तिसऱ्या स्थानी विराजमान आहे.

Intro:Body:

Sports 04

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.