ETV Bharat / sports

कोरोनाच्या धोक्यामुळे न्यूझीलंड संघाला एकांतवासात राहण्याचे निर्देश

author img

By

Published : Mar 19, 2020, 3:04 PM IST

न्यूझीलंड बोर्डाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यानुसार, सिडनीहून परत आलेल्या सर्व १५ खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांच्या घरीच रहावे लागेल. न्यूझीलंडची पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी १८ मार्च रोजी दिलेल्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

Coronavirus Threat: NZ Cricket Team Placed In 14-day Self Isolation After Returning From Australia
कोरोनाच्या धोक्यामुळे न्यूझीलंड संघाला एकांतवासात राहण्याचे निर्देश

वेलिंग्टन - कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्यामुळे ऑस्ट्रेलिया- न्यूझीलंड यांच्यातील चॅपेल-हॅडली एकदिवसीय मालिका रद्द करण्यात आली. यानंतर न्यूझीलंडचा संघ मायदेशी परतला आहे. पण, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने संघातील सर्व खेळाडूंना १४ दिवस एकांतवासात राहण्याचे निर्देश दिले आहेत.

न्यूझीलंड बोर्डाने एक निवेदन जाहीर केलं आहे. त्यानुसार, सिडनीहून परत आलेल्या सर्व १५ खेळाडू आणि सहाय्यक कर्मचार्‍यांना त्यांच्या घरीच रहावे लागेल. न्यूझीलंडची पंतप्रधान जॅकिंडा आर्डर्न यांनी १८ मार्च रोजी दिलेल्या सूचनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे.

याविषयी न्यूझीलंड क्रिकेटचे पब्लिक अफेयर्स मॅनेजर रिचर्ड ब्रूक यांनी सांगितलं की, 'ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील न्यूझीलंडचा संघ आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांना एकांतवासात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. ते या नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत.'

दरम्यान, याआधी भारतातून मायदेशी परतलेल्या दक्षिण आफ्रिकेचा संघाला एकांतवासात राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. कोरोना विषाणूने संपूर्ण जगात थैमान घातला आहे. आतापर्यंत कोरोनाची लागण होऊन ८ हजारांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर १५० हून अधिक देशांमध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे.

हेही वाचा - 'पाक खेळाडूंची टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही, धावा न केल्यास फलंदाजाला फुकटात राबवा'

हेही वाचा - पाकिस्तान सुपर लीग : 'त्या' १२८ जणांची कोरोना चाचणी, समोर आला अहवाल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.