ETV Bharat / sports

'बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप'मध्ये भारताचा विजयारंभ

author img

By

Published : Feb 11, 2020, 6:14 PM IST

पहिल्या सामन्यात भारताने कझाकिस्तानला ४-१ असे पराभूत केले. १३ फेब्रुवारीला भारत मलेशियाविरूद्ध खेळणार आहे.

Indian badminton team won their first match in the Asian Team Championship
बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विजयारंभ

मनिला - फिलिपाईन्सच्या राजधानीत मंगळवारपासून सुरू झालेल्या 'बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिप'च्या पहिल्या सामन्यात भारताने कझाकिस्तानला ४-१ असे पराभूत केले. भारतासाठी किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि शुभांकर डे यांनी 'ब' गटातील पुरुष एकेरीत विजय मिळवले. तर, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी दुहेरीत विजय मिळवला. दुहेरीच्या दुसर्‍या सामन्यात एचएस प्रणय आणि चिराग शेट्टी पराभूत झाले.

हेही वाचा - तब्बल ३१ वर्षानंतर भारताला मिळाला व्हाईटवॉश!

दिवसाच्या पहिल्या सामन्यात श्रीकांतने दिमित्री पनारिनचा २१-१०, २१-१७ असा पराभव करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लक्ष्यने अर्तुर जियाजोवचा २१-१३, २१-८ असा पराभव करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

तिसर्‍या सामन्यात शुभांकरने खैतमुरत कुल्मातोवचा २१-११, २१-५ असा पराभव केला. प्रणॉय आणि शेट्टी यांना मात्र अर्तूर आणि पनारिन जोडीकडून २१-१८, १६-२१, १९-२१ असा पराभव स्विकारावा लागला. हा सामना ४२ मिनिटे चालला.

अंतिम सामन्यात अर्जुन आणि कपिलाने निकिता ब्रॅगिन आणि खैतमुरतचा २१-१४, २१-८ असा पराभव करून भारताला ४-१ ने विजय मिळवून दिला. १३ फेब्रुवारीला भारत मलेशियाविरूद्ध खेळणार आहे.

Intro:Body:

बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपमध्ये भारताचा विजयारंभ

मनिला - फिलिपाईन्सच्या राजधानीत मंगळवारपासून सुरू झालेल्या बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियनशिपच्या पहिल्या सामन्यात भारताने कझाकिस्तानला ४-१ असे पराभूत केले. भारतासाठी किदाम्बी श्रीकांत, लक्ष्य सेन आणि शुभांकर डे यांनी 'ब' गटातील पुरुष एकेरीत विजय मिळवले. तर, एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला यांनी दुहेरीत विजय मिळवला. दुहेरीच्या दुसर्‍या सामन्यात एचएस प्रणय आणि चिराग शेट्टी पराभूत झाले.

हेही वाचा -

दिवसाच्या पहिल्या सामन्यात श्रीकांतने दिमित्री पनारिनचा २१-१०, २१-१७ असा पराभव करून भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लक्ष्यने अर्तुर जियाजोवचा २१-१३, २१-८ असा पराभव करून संघाला २-० अशी आघाडी मिळवून दिली.

तिसर्‍या सामन्यात शुभांकरने खैतमुरत कुल्मातोवचा २१-११, २१-५ असा पराभव केला. प्रणॉय आणि शेट्टी यांना मात्र अर्तूर आणि पनारिन जोडीकडून २१-१८, १६-२१, १९-२१ असा पराभव स्विकारावा लागला. हा सामना ४२ मिनिटे चालला.

अंतिम सामन्यात अर्जुन आणि कपिलाने निकिता ब्रॅगिन आणि खैतमुरतचा २१-१४, २१-८ असा पराभव करून भारताला ४-१ ने विजय मिळवून दिला. १३ फेब्रुवारीला भारत मलेशियाविरूद्ध खेळणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.