ETV Bharat / sitara

'देवा श्री गणेशा' या मालिकेत 'हा' अभिनेता साकारणार गणपती बाप्पाची भूमिका

author img

By

Published : Aug 13, 2020, 6:12 PM IST

स्टार प्रवाहवर ऐन गणेशोत्सवात सुरू होणाऱ्या 'देवा श्री गणेशा' ही अकरा भागांची मालिका सुरू होत आहे. मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका अभिनेता अद्वैत कुलकर्णी साकारणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे दाखवण्यात येणार असल्याचे स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी सांगितले.

Deva Shri Ganesha'
'देवा श्री गणेशा

मुंबई - स्टार प्रवाहवर ऐन गणेशोत्सवात सुरू होणाऱ्या 'देवा श्री गणेशा' या मालिकेत गणपती बाप्पाची भूमिका अभिनेता अद्वैत कुलकर्णी साकारणार आहे. गणपती बाप्पाची भूमिका साकारायला मिळावी ही त्याची लहानपणापासूनची इच्छा होती आणि या मालिकेच्या निमित्ताने अद्वैतचं हे स्वप्न पूर्ण होत आहे.

गणपती बाप्पाप्रमाणेच अद्वैतला मोदक खायला खूप आवडतात. ‘देवा श्री गणेशा’ या मालिकेच्या निमित्ताने सेटवर मोदकांची मेजवानी दररोज असते. सेटवर संपूर्णपणे काळजी घेत आम्ही शूट करतो. सुरुवातीला बाप्पाच्या रुपात तयार होण्यासाठी २ तास लागायचे मात्र आता तासाभरात आमची टीम मला तयार करते असं अद्वैतने सांगितलं.

या भव्यदिव्य मालिकेविषयी सांगताना स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘दैनंदिन मालिकांच्या गर्दीत स्टार प्रवाह फक्त ११ विशेष भागांची मालिका घेऊन येत आहे. रसिक प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या ११ दिवसांत ११ सशक्त आणि विशेष काहीतरी द्यायचा प्रयत्न आहे. सध्याच्या परिस्थितीत दरवर्षीप्रमाणे बाहेर पडता येणार नाही. त्यामुळे स्टार प्रवाह आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या भव्य रुपाचं दर्शन घरोघरी घडवून आणणार आहे. बाप्पाच्या गोष्टींमध्ये लपलेले आणि माहित नसलेले पैलू या विशेष मालिकेद्वारे संपूर्ण कुटुंब एकत्र बसून बघू शकतील. या भव्य मालिकेतून संस्कार घडवणाऱ्या छान गोष्टी भव्य स्वरुपात पहायला मिळणार आहेत. बाप्पाच्या या गोष्टी पहाताना मन गर्व आणि आनंदाने नक्कीच भरुन येईल अशी खात्री आहे.’

चौसष्ट कलांचा अधिपती असणाऱ्या बाप्पाविषयीच्या अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलोय. पण या गोष्टींमागे असणाऱ्या अनेक रहस्यमयी कथांबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही. बाप्पाच्या जन्मापासून ते अगदी लग्नापर्यंतच्या अशा गोष्टी ज्या आपण ऐकल्या आहेत पण त्याविषयी आपल्याला फारशी माहिती नाही ते दाखवण्याचा प्रयत्न या अनोख्या मालिकेतून करण्यात येणार आहे. अगदी उदाहरण द्यायचं झालं तर गणेशोत्सव काळात चंद्रांचं तोंड पाहू नये अन्यथा चोरीचा आळ येतो असं ऐकीवात आहे. बाप्पाची झालेली फजिती पाहून चंद्र हसला आणि बाप्पाने चंद्राला शाप दिला ही गोष्ट प्रचलित आहेच. मात्र चंद्राला शाप दिलेल्या बाप्पाच्या भाळी चंद्र कसा? बाप्पा भालचंद्र कसा झाला? याची कथा मात्र बऱ्याच जणांना माहित नाही. ‘देवा श्री गणेशा’ या ११ भागांच्या विशेष मालिकेतून ११ ऐकलेल्या मात्र त्याविषयी फारशी माहिती नसलेल्या बाप्पाच्या पौराणिक गोष्टींचा उलगडा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात स्टार प्रवाह वाहिनी मनोरंजनाचा अनोखा ठेवा घेऊन येणार आहे. 22 तारखेला गणेश चतुर्थीच्या दिवसापासून या मालिकेला सुरुवात होत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.