ETV Bharat / sitara

स्टार प्रवाहच्या नायिका गणपती बाप्पाचं स्वागत करणार अनोख्या अंदाजात!

author img

By

Published : Sep 7, 2021, 10:45 PM IST

स्टार प्रवाहवर १२ सप्टेंबरला दाखवल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या गणपती विशेष कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार असल्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार आहे.

स्टार प्रवाहच्या नायिका
स्टार प्रवाहच्या नायिका

रुपाली भोसले, मधुराणी गोखले प्रभुलकर, हर्षदा खानविलकर, गिरीजा प्रभू, समृद्धी केळकर, माधवी निमकर या प्रसिद्ध अभिनेत्री स्टार प्रवाहाच्या लोकप्रिय मालिकांमधून संजना, अरुंधती, सौंदर्या, गौरी, कीर्ती आणि शालिनीच्या भूमिकांत प्रेक्षकांचे मनोरंजन करताहेत. गणेशोत्सव जवळ आलाय आणि आता या सर्व स्टार प्रवाहच्या नायिका अनोखा अंदाजात गणपती बाप्पाचं स्वागत करणार आहेत. त्यांच्या हटके लूकची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

स्टार प्रवाहवर १२ सप्टेंबरला दाखवल्या जाणाऱ्या ‘स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१’ या गणपती विशेष कार्यक्रमाच्या प्रोमोजनी सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाच्या स्वागतासाठी संपूर्ण स्टार प्रवाह परिवार एकत्र येणार असल्यामुळे गणेशोत्सवाची रंगत द्विगुणीत होणार यात शंका नाही. या विशेष कार्यक्रमात स्टार प्रवाहच्या नायिकांचा हटके अंदाज पाहायला मिळणार आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ हा कार्यक्रम म्हणजे मनोरंजनाचा डबल धमाका असणार आहे. ढोल-ताश्यांच्या गजरात बाप्पाचं स्वागत करण्यापासून ते अगदी आरती, गणेशजन्माची कथा, बाप्पाची गाणी असं सगळं अगदी जल्लोषात पार पडणार आहे. सणासुदीचे दिवस म्हण्टले तर आपले पारंपरिक खेळही ओघाने आलेच. स्टार प्रवाहच्या मालिकांमधल्या तुमच्या आवडीच्या सासु-सुनांच्या जोड्या मंगळागौरीचे खास खेळ देखिल खेळणार आहेत. त्यामुळे मनोरंजनाने परिपूर्ण असा हा गणपती विशेष कार्यक्रम असेल.

आई कुठे काय करते मालिकेतील संजनाला आपण आतापर्यंत मॉडर्न अंदाजात पाहात आलोय. मात्र गणपती विशेष कार्यक्रमाच्या निमित्ताने संजनाचा नऊवारी साडीतला हटके लूक पाहायला मिळणार आहे. तर तिकडे सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेतील गौरी आणि शालिनीने पारंपरिक साडीला आधुनिकतेची जोड देत सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे. आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती आणि रंग माझा वेगळा मालिकेतील सौंदर्या इनामदार यांचं साडीमध्ये सौंदर्य आणखीनच खुलून आलं आहे.

स्टार प्रवाह परिवाराचा गणपती असल्यामुळे या परिवाराचा अतिशय महत्त्वाचा भाग असणाऱ्या प्रेक्षकांनाही या कार्यक्रमाचं खास निमंत्रण आहे. रविवार १२ सप्टेंबरला संध्याकाळी ७ वाजल्यापासून प्रेक्षकांना या कार्यक्रमाचा आस्वाद घरबसल्या घेता येईल.

स्टार प्रवाह परिवार गणशोत्सव २०२१ साजरा होत आहे १२ सप्टेंबरला सायंकाळी ७ वाजता.

हेही वाचा - पुण्यातील युवकांनी रस्त्यांवर येऊन ‘मनी हाईस्ट' स्टाईलने लस घेण्याचं केले आवाहन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.