पोर्ट ब्लेयर - सुशांतसिंहने १४ जूनला आत्महत्या करत या जगाचा निरोप घेतला होता. त्याच्या जाण्याचा धक्का अनेकांना बसलाय. विशेषः जी वयात येणारी मुले आहेत त्यांना हा मोठा आघात आहे.
सुशांतच्या निधनानंतर अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. आता आलेली बातमी अंदमान आणि निकोबार बेटामधूनची आहे. येथील १५ वर्षीय मुलीने १७ जून रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तिच्याकडे कोणतीही सुसाईड नोट मिळालेली नाही. परंतु एक डायरी सापडली आहे. यात सुशांतसंबंधी काही गोष्टी लिहिल्या आहेत. तिला सुशांत खूप आवडत होता. त्यामुळे या मृत्यूला सुशांतच्या मृत्यूशी जोडून पाहिले जात आहे. मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसांना सांगितले की, गेल्या काही दिवसापासून ती डिप्रेशनमुळे त्रस्त झाली होती. पोलीस आता या घटनेचा संबंध सुशांतच्या मृत्यूशी जोडून तपास करत आहे.
ओडिशातील कटकच्या जोबरा भागातील एका १४ वर्षाच्या फॅनने सुशांतच्या निधनाच्या धक्क्याने आत्महत्या केली होती. घरचे सदस्य नसताना तिने हे पाऊल उचलले होते. नववीत शिकणाऱ्या या मुलीचे नाव सौम्या श्रीराज असे आहे.